MI vs PBKS: वानखेडेवर मुंबईसमोर 'पंजाब'चे आव्हान! विजयाचा रथ रोखण्यासाठी 'पलटण' सज्ज; हेड टू हेडमध्ये बरोबरीची लढत

IPL 2026 Match 24 Mumbai vs Punjab: आयपीएल २०२६ चा २४ वा सामना मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.
Mumbai vs Punjab
Mumbai vs PunjabDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: आयपीएल २०२६ चा २४ वा सामना मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. एका बाजूला सलग विजय मिळवत विजयरथावर स्वार असलेला पंजाब किंग्सचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला विजयासाठी झगडणारा मुंबई इंडियन्सचा संघ. या मोसमात पंजाबने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, तर मुंबईला ४ पैकी केवळ १ सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर मुंबई पंजाबला रोखणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हेड टू हेड: ३४ सामने, १७-१७ अशी बरोबरी!

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील इतिहास पाहिला तर दोन्ही संघ एकमेकांना तोडीस तोड ठरले आहेत. आतापर्यंत झालेल्या ३४ सामन्यांपैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी १७-१७ सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या हंगामात पंजाबने मुंबईविरुद्धच्या दोन्ही सामन्यांत बाजी मारली होती. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल, तो हेड टू हेड रेकॉर्डमध्ये आघाडी घेईल.

Mumbai vs Punjab
Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

मुंबईला हवीये 'लय', पंजाबचा फॉर्म 'हाय'

मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विजयाने सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीकडून त्यांना सलग तीन पराभव स्वीकारावे लागले. दुसरीकडे, पंजाब किंग्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असून ४ पैकी ३ सामने जिंकून त्यांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. लक्ष्याचा पाठलाग (Chasing) करताना पंजाबचा संघ अधिक घातक ठरत आहे, जे मुंबईसाठी चिंतेचे कारण असू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com