New Rule for IPL 2026: आयपीएल 2026 साठी बीसीसीआयचे 'मिशन शिस्त'; मैदानावरील वर्तणुकीपासून सरावापर्यंत कडक नियम लागू

BCCI New Rule for IPL:जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या 'इंडियन प्रीमियर लीग' (IPL 2026) च्या १९ व्या हंगामाला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे.
New IPL Guidelines
New Rule for IPL 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या 'इंडियन प्रीमियर लीग' (IPL 2026) च्या १९ व्या हंगामाला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे. या आगामी हंगामासाठी बीसीसीआयने (BCCI) कंबर कसली असून खेळाडू आणि संघांसाठी ७ अत्यंत महत्त्वाचे आणि कडक नियम जाहीर केले आहेत. हे नियम केवळ खेळापुरते मर्यादित नसून, संघांची सराव पद्धती, खेळाडूंचे वैयक्तिक दौरे आणि मैदानावरील शिस्तीशी संबंधित आहेत. सर्व १० संघांना या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.

सामन्याच्या दिवशी सरावावर बंदी

बीसीसीआयने जाहीर केलेल्या पहिल्या नियमानुसार, ज्या दिवशी संघाचा सामना असेल, त्या दिवशी कोणत्याही संघाला सराव किंवा ट्रेनिंग करण्याची परवानगी नसेल. यामुळे खेळाडूंना सामन्यापूर्वी पूर्ण विश्रांती मिळावी, हा उद्देश आहे. दुसऱ्या नियमानुसार, कोणत्याही संघाला संपूर्ण हंगामात २ पेक्षा जास्त सराव सामने खेळता येणार नाहीत. या सामन्यांसाठी बीसीसीआयची पूर्वपरवानगी अनिवार्य असेल आणि हे सराव सामने ३.५ तासांपेक्षा जास्त काळ चालणार नाहीत, याची दक्षता संघांना घ्यावी लागेल.

'नेट प्रॅक्टिस' आणि खेळपट्टीच्या वापराबाबत नवे धोरण

तिसऱ्या नियमात सरावाच्या जाळ्यांबाबत (Nets) स्पष्टता देण्यात आली आहे. आता प्रत्येक संघाला सरावासाठी स्वतंत्र नेट्स दिले जातील. एका संघाला दुसऱ्या संघाचे नेट्स वापरता येणार नाहीत, मग ते रिकामे का असेनात.

चौथ्या नियमानुसार, ज्या खेळपट्टीवर होम टीमचा पहिला सामना होणार आहे, त्या खेळपट्टीवर सामन्याच्या ४ दिवस आधी सरावाला बंदी असेल. रेंज हिटिंग आणि रन-अप ड्रील्ससाठी वेगळी विकेट दिली जाईल. तसेच, एका संघानंतर दुसऱ्या संघाने सराव केल्यास दरवेळी नवीन खेळपट्टी तयार करून द्यावी लागणार आहे.

खेळाडूंचे कुटुंबीय आणि प्रवासावर निर्बंध

पाचव्या आणि सर्वात महत्त्वाच्या नियमाचा फटका खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्याला बसू शकतो. बीसीसीआयने खेळाडूंसोबत त्यांचे कुटुंबीय किंवा मित्रांना प्रवास करण्यास मनाई केली आहे. सराव किंवा सामन्यासाठी जाताना खेळाडूंना केवळ 'टीम बस'चाच वापर करावा लागेल, वैयक्तिक गाड्यांना परवानगी नसेल. याशिवाय, सहाव्या नियमानुसार खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला मैदानावरील 'एलईबी' (LEB) बोर्डाजवळ बसण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com