IPL 2024 'या' दिवशी होणार सुरू? संभाव्य तारखांबद्दल महत्त्वाची अपडेट्स आले समोर

IPL 2024 Schedule: यावर्षी आयपीएलचा 17 वा हंगाम खेळवण्यात येणार असून या हंगामाच्या संभाव्य तारखांबद्दल अपडेट समोर आली आहे.
IPL Auction 2023
IPL Auction 2023Dainik Gomantak

IPL 2024 tentative dates:

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा 17 वा हंगाम यावर्षी खेळवण्यात येणार आहे. गेल्याच महिन्यात म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये या हंगामाचा लिलाव पार पडला. आता हा हंगाम कधी सुरू होणार याची उत्सुकता अनेक क्रिकेट चाहत्यांना आहे.

दरम्यान, मीडियातील रिपोर्ट्सनुसार आयपीएल 2024 हंगाम 22 मार्च ते 26 मे 2024 दरम्यान खेळवला जाऊ शकतो. हंगामानंतर लगेचच जून 2024 मध्ये कॅरेबियन बेटे (वेस्ट इंडिज) आणि अमेरिकेत टी20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे.

IPL Auction 2023
Year Ending: मॅथ्यूज टाईम आऊट ते IPL लिलाव, 2023 मधील 'या' 5 घटनांनी क्रिकेट चाहत्यांना केलं चकीत

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने वूमन्स प्रीमियर लीग 2024 (WPL) हंगामाच्या संभाव्य तारखांबाबत त्यांच्या गुंतवणूकदारांशी चर्चा केली आहे. त्यानुसार डब्ल्युपीएलचा हा हंगाम 22 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान खेळवला जाऊ शकतो. त्यानंतर पाचच दिवसात आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होऊ शकते.

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की अद्याप बीसीसीआयकडून डब्ल्युपीएल आणि आयपीएल यांच्या 2024 मधील हंगामाबाबतच्या तारखांबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

तरी आयपीएल 2024 स्पर्धेच्या तारखा बीसीसीआयला लोकसभा निवडणूकीच्या तारखांनुसार ठरवावे लागणार आहे. दरम्यान, निवडणूकांमुळे हा हंगाम भारतातच होणार की यापूर्वीप्रमाणे परदेशात होणार हे देखील अद्याप अनिश्चित आहे. तरी बीसीसीआयचा प्रयत्न हा हंगाम भारतातच खेळण्याचा असल्याची मीहिती मिळाली होती.

IPL Auction 2023
Suryakumar Yadav: सूर्यकुमारवर जर्मनीत झाली सर्जरी! IPL मध्ये करणार पुनरागमन?

याआधी 2009 साली निवडणूकांमुळे आयपीएलचा हंगाम दक्षिण आफ्रिकेत पार पडला होता, तर 2014 साली आयपीएलचा पहिला टप्पा युएईमध्ये झाला होता, तर दुसरा टप्पा भारतात झाला होता.

तथापि, बीसीसीआयला आयपीएलचे वेळापत्रक तयार करताना केवळ लोकसभा निवडणूकीचाच नाही, तर टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचाही विचार करावा लागणार आहे. कारण ही स्पर्धा लगेचच 2 जूनपासून सुरू होत आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com