मुंबई इंडियन्सने IPL 2024 चे शेड्यूल शेअर करताच कमेंटचा पडला पाऊस, चाहते म्हणतात...

IPL 2024 Fans Reaction on Mumbai Indians Post: यंदाच्या आयपीएल (IPL 2024) सीझनचे वेळापत्रक आज (22 फेब्रुवारी रोजी) जाहीर करण्यात आले.
IPL 2024 Fans Reaction on Mumbai Indians Post:
IPL 2024 Fans Reaction on Mumbai Indians Post:Dainik Gomantak

IPL 2024 Fans Reaction on Mumbai Indians Post: यंदाच्या आयपीएल (IPL 2024) सीझनचे वेळापत्रक आज (22 फेब्रुवारी रोजी) जाहीर करण्यात आले. मात्र, सध्या केवळ 22 मार्च ते 7 एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक पोस्टरही जारी केले आहे. ज्यामध्ये कर्णधार हार्दिक पांड्यासोबत माजी कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, टीम डेव्हिड आणि जेराल्ड कोएत्झी दिसत आहेत.

तसेच, या पोस्टरमध्ये मुंबई इंडियन्सने हे देखील सांगितले आहे की, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली एमआय कोणत्या संघासोबत कधी आणि कोणत्या वेळी आपले सामने खेळणार आहे. मात्र, या पोस्टवर चाहतेही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. चला तर मग या पोस्टरवर चाहत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या जाणून घेऊया...

दरम्यान, यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेऊन हार्दिक पांड्याकडे सोपवले. फ्रँचायझीच्या या निर्णयानंतर बराच गदारोळ झाला. रोहित शर्माला कर्णधार बनवण्याची मागणीही चाहते करत होते. मात्र मुंबई इंडियन्स आपल्या निर्णयावर ठाम राहिली. आता MI च्या नवीन पोस्टरवर रोहित आणि हार्दिक पांड्या एकत्र दिसत आहेत. हे पाहिल्यानंतर चाहते कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, रोहित नाही, आता सीएसके हा माझा आवडता संघ आहे. दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, आम्हाला कर्णधार म्हणून रोहित शर्मा परत हवा आहे. तथापि, काही चाहते हार्दिक पांड्याला आगामी आयपीएल हंगामासाठी शुभेच्छाही देत ​​आहेत.

IPL 2024 Fans Reaction on Mumbai Indians Post:
Mohammad Shami: गिलच्या गुजरात टायटन्सचं टेन्शन वाढलं! शमी IPL 2024 मधून बाहेर, मोठी अपडेट आली समोर

मुंबई इंडियन्सचे सामने कधी आणि कोणासोबत होणार?

हार्दिक पांड्या पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद भूषवत असून त्याचा पहिला सामना त्याचा जुना संघ गुजरात टायटन्सशी होणार आहे. पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला होणार आहे. यानंतर, एमआय 27 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादसोबत दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल आणि तिसरा सामना 1 एप्रिल रोजी राज्यस्थानशी खेळला जाईल. तर त्याचा शेवटचा सामना 7 एप्रिल रोजी ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. मुंबईचे पहिले तीन सामने संध्याकाळी 7:30 वाजता, तर शेवटचा सामना 3:30 वाजता खेळवला जाईल.

IPL 2024 Fans Reaction on Mumbai Indians Post:
IPL Auction 2024: 'सारख्याच नावामुळे गोंधळ अन्...', पंजाब किंग्सचे शशांक सिंगला खरेदी करण्यावर स्पष्टीकरण

मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे

दुसरीकडे, 2013 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले होते. तेव्हापासून त्याने मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले आहे. आता हार्दिक पांड्या त्याच्या नेतृत्वाखाली सहाव्यांदा मुंबई इंडियन्सला आयपीएलचे जेतेपद मिळवून देईल अशी अपेक्षा आहे. 2022 मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना हार्दिकने त्यांना पहिल्या सत्रातच चॅम्पियन बनवले होते. त्यानंतर पुढच्या सत्रात हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने अंतिम फेरी गाठली होती. मात्र, धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जकडून त्यांना अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com