IPL 2024 चा हंगाम भारतात नाही, तर परदेशात रंगणार? 'हे' कारण आले समोर

आयपीएल 2024 स्पर्धा पुढीलवर्षी भारतातून बाहेर हलवली जाण्याची शक्यता आहे.
IPL Captains
IPL CaptainsDainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2024 may shift out of India: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेबद्दल एक मोठी माहिती समोर येत आहे. पुढच्यावर्षी आयपीएल या लोकप्रिय टी20 लीग स्पर्धेचा 17 वा हंगाम खेळला जाणार आहे. पण हा हंगाम भारतातून बाहेर होण्याची दाट शक्यता आहे.

मीडियातील रिपोर्ट्सनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आयपीएल 2024 हंगाम लवकर करण्याच्या विचार करत आहे. त्याचबरोबर हा हंगाम परदेशातही खेळवला जाऊ शकतो. याचे सर्वात मोठे कारण पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूका हे आहे.

IPL Captains
Cricketer Retirement: IPL मध्ये वन सिजन वंडर ठरलेल्या या भारतीय क्रिकेटरची निवृत्ती; CSK विरुद्ध ठोकलेलं शतक

यापूर्वी अशाच कारणाने म्हणजेच लोकसभा निवडणूकीमुळे दोन वेळा भारतातून आयपीएलचे सामने परदेशात हलवण्यात आले आहेत. 2009 साली संपूर्ण आयपीएल हंगाम दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडला होता, तर 2014 साली आयपीएलचा अर्धा हंगाम युएईमध्ये झाला होता.

स्पोर्ट्सतकच्या रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयच्या एका सुत्राने सांगितले आहे की पुढीलवर्षी लोकसभा निवडणूका असल्याच्या कारणाने आयपीएल 2024 साठी विंडो शोधून स्पर्धा लवकर घेतली जाऊ शकते. आम्हाला माहित आहे की निवडणूका होणार आहेत आणि सर्व गोष्टी आमच्या योजनेत आहेत.'

IPL Captains
Lucknow Super Giants: ऑस्ट्रेलियाला टी20 जगज्जेता करणारा दिग्गज लखनऊचा नवा हेड कोच! गंभीरसह IPL मध्ये करणार मार्गदर्शन

तसेच सुत्राने सांगितले की जर गरज पडली कर आयपीएल पुढच्या वर्षी मार्चमध्ये लवकर घेतले जाऊ शकते. याबरोबरच या हंगामाचा शेवट मे महिन्याच्या मध्यात केले जाऊ शकते. तथापि, सध्या आमचे लक्ष यावर्षी भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2023 वर आहे. आयपीएलसाठी अद्याप बराच वेळ आहे. पुढे कशा गोष्टी घडतात ते पाहू.

याशिवाय बीसीसीआयच्या सुत्राने परदेशातही स्पर्धेचे आयोजन गरज पडल्यास केले जाऊ शकते, असे सांगितले आहे. तरी भारतातच स्पर्धा आयोजिक करण्याला प्राधान्य असेल.

आयपीएल 2023 स्पर्धा चेन्नईने जिंकली

आयपीएल 2023 स्पर्धा मे महिन्याच्या अखेरीत एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाने जिंकली होती. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाला चेन्नई सुपर किंग्सने अखेरच्या चेंडूवर पराभवाचा धक्का दिला.

हे चेन्नईचे आयपीएलमधील पाचवे विजेतेपद आहे. त्यामुळे आता आयपीएलमध्ये सर्वाधिक विजेतेपद जिंकण्याचा विक्रम मुंबई इंडियन्ससह चेन्नई सुपर किंग्सच्या नावावरही झाला आहे. या दोन्ही संघांनी प्रत्येकी 5 वेळा आयपीएल विजेतेपद जिंकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com