IPL 2023: LIVE मॅचमध्येच हार्दिक पांड्याचा चढला पारा, व्हिडिओ व्हायरल होताच...

Hardik Pandya Video: गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 Hardik Pandya
Hardik PandyaDanik Gomantak
Published on
Updated on

Hardik Pandya Video: गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुरुवारी पंजाब किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यादरम्यान हार्दिक आपल्याच संघातील खेळाडूवर रागावताना दिसला.

आपल्याच संघातील खेळाडूसोबतच्या अशा वर्तनाबाबत सोशल मीडियावर हार्दिक ट्रोल होत आहे. हार्दिक पांड्याचे हे वर्तन त्याच्याच खेळाडूसोबत कसे, असा सवाल चाहते ट्विटरवर विचारत आहेत.

LIVE मॅचमध्ये हार्दिक पंड्या आपल्याच खेळाडूवर रागावताना दिसला

मोहालीत गुरुवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात पंजाब किंग्जच्या फलंदाजीदरम्यान कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) डावाच्या 20व्या षटकात वेगवान गोलंदाज जोशुआ लिटिलकडे चेंडू सोपवला.

हे षटक सुरु होण्यापूर्वी गुजरात टायटन्सचा संघ निर्धारित वेळेत षटक पूर्ण करु शकला नाही. दरम्यान, शेवटच्या षटकाचा दुसरा चेंडू टाकण्यापूर्वी डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण करणारा मोहित शर्मा त्याच्या पोजीशनपासून थोडासा दूर उभा होता.

 Hardik Pandya
IPL 2023: अंपायर दवामुळे बॉल बदलू शकतात का? अश्विननेही विचारला प्रश्न; नक्की भानगड काय, घ्या जाणून

व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ उडाली

29 वर्षीय हार्दिक पांड्या डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण करणार्‍या मोहित शर्मावर संतापला, जो त्याच्या पोजीशनपासून थोडासा दूर उभा होता.

कर्णधार हार्दिक पांड्या 34 वर्षीय खेळाडू मोहित शर्माला हातवारे करत आक्रमक स्वरात काहीतरी बोलताना दिसला. पांड्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 Hardik Pandya
IPL 2023: आर अश्विनला CSK vs RR मॅचनंतरचं 'ते' व्यक्तव्य भोवलं? झाली मोठी कारवाई

दुसरीकडे, सलामीवीर शुभमन गिलच्या शानदार गोलंदाजीनंतर 67 धावांच्या अर्धशतकाच्या बळावर गतविजेत्या गुजरात टायटन्सने गुरुवारी येथे इंडियन प्रीमियर लीग (IPL) सामन्यात पंजाब किंग्जचा एका चेंडू राखून सहा गडी राखून पराभव केला.

सुरुवातीचे धक्के आणि गतविजेत्या गुजरात टायटन्सच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाला घरच्या मैदानावर आठ विकेट्सवर केवळ 153 धावाच करता आल्या.

गिलच्या 49 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराने खेळलेल्या खेळीनंतरही गुजरात टायटन्सने 19.5 षटकांत विजय मिळवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com