IPL 2023: आधी फलंदाजांनी ठोकलं, मग गोलंदाजांनी रोखलं! राजस्थानचा हैदराबादवर दणदणीत विजय

SRH vs RR: राजस्थान रॉयल्सने त्यांच्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मोठा विजय मिळला. राजस्थानकडून 3 फलंदाजांनी अर्धशतके केली.
Rajasthan Royals
Rajasthan RoyalsDainik Gomantak
Published on
Updated on

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी डबल हेडरचे सामने (एका दिवसात दोन सामने) खेळवले जात आहेत. या दिवसातील पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात राजस्थानने 72 धावांनी विजय मिळवला.

राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादसमोर 204 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदाराबादला 8 बाद 131 धावाच करता आल्या.

Rajasthan Royals
हार्दिकचं टेंशन वाढलं! केन विलियम्सन IPL 2023 मधून 'या' कारणानं बाहेर

या सामन्यात 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली झाली नव्हती. पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांना शुन्यावर बाद केले. त्यानंतर सर्वांचेच लक्ष असलेल्या हॅरी ब्रुकला युझवेंद्र चहलने १३ धावांवर त्रिफळाचीत केले. वॉशिंग्टन सुंदर (1) आणि ग्लेन फिलिप्स (8) यांनीही स्वस्तात विकेट गमावली.

त्यानंतर एक बाजू सांभाळलेल्या मयंक अगरवाललाही चहलने 27 धावांवर बाद केले. चहलने आदील राशिद (18) आणि भुवनेश्वर कुमार (6) यांनाही झटपट माघारी धाडले. पण नंतर अब्दुल सामद आणि उमरान मलिक नाबाद राहिले, पण तोपर्यंत हैदराबादपासून विजय दूर गेला होता. सामद 32 धावांवर आणि उमरान 19 धावांवर नाबाद राहिले.

राजस्थानकडून चहलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच ट्रेंट बोल्टने 2 विकेट्स घेतल्या, तर जेसन होल्डर आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Rajasthan Royals
IPL 2023: SRH vs RR सामन्यापूर्वी का पाळलं खेळाडू अन् अधिकाऱ्यांनी मौन? जाणून घ्या कारण

तत्पूर्वी, राजस्थानने दणक्यात सुरुवात केली होती. राजस्थानचा सलामीवीर फलंदाज जोस बटलरने आक्रमक खेळ करताना पहिल्या 5 षटकातच संघाला 80 धावांच्या जवळपास पोहचवले. पण अखेर त्याला फझलहक फारुकीने सहाव्या षटकात त्रिफळाचीत केले. बटलरने 22 चेंडूत 54 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 3 षटकार मारले.

पण, त्यानंतर यशस्वी जयस्वालने आक्रमक पवित्रा स्विकारला आणि त्यानेही अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर त्यालाही फझलहक फारुकीनेत बाद केले. जयस्वालने 37 चेंडूत 54 धावांची खेळी केली. पण नंतर देवदत्त पडिक्कल आणि रियान पराग यांनी लवकर विकेट्स गमावल्या.

मात्र दुसऱ्या बाजूने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने ताबडतोड अर्धशतक केले. त्याने 32 चेंडूत 55 धावांची खेळी केली. त्याला 19 व्या षटकात टी नटराजनने बाद केले. पण तीन फलंदाजांनी अर्धशतके केल्याने राजस्थानने 20 षटकात 5 बाद 203 धावा केल्या. राजस्थानकडून शिमरॉन हेटमायरने 16 चेंडूत 22 धावांची नाबाद खेळी केली.

हैदराबादकडून फझलहक फारुकी आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच उमरान मलिकने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com