IPL 2023: हैदराबादची टॉस जिंकून पहिली बॅटिंग, समोर लखनऊचे आव्हान! असे आहेत Playing XI

आयपीएल 2023 स्पर्धेत शनिवारी पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात होत आहे.
SRH vs LSG
SRH vs LSG Dainik Gomantak

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत 58 वा सामना शनिवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात होत आहे. शनिवारी दोन सामने होणार असून हा पहिला सामना आहे. हा सामना हैदराबादच्या घरच्या मैदानावर म्हणजेच राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे.

या सामन्यात लखनऊचा कर्णधार एडेन मार्करमने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

SRH vs LSG
IPL 2023 Playoff equation: गुजरात-चेन्नईचे स्थान पक्के? मुंबई साठी समीकरण कसे असेल वाचा सविस्तर

या सामन्यासाठी दोन्ही संघात बदल झाले आहेत. या सामन्यासाठी हैदराबादने सनवीर सिंगला संधी दिली आहे. तसेच लखनऊने प्रेरक मंकड आणि युधवीर सिंग चरक यांना दीपक हुडा आणि मोहसिन खान यांच्या जागेवर संघात संधी दिली आहे.

तसेच या सामन्यात हैदराबादने कर्णधार मार्करमव्यतिरिक्त हेन्रिक क्लासेन, ग्लेन फिलिप्स आणि फझलहक फारुकी या परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. तसेच लखनऊने क्विंटन डी कॉक, काईल मेयर्स, मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन या परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

त्यामुळे दोन्ही संघात प्रत्येकी चार परदेशी खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये असल्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूला वापरता येणार आहे.

SRH vs LSG
IPL 2023: 11 चौकार 6 षटकार, वानखेडेमध्ये सूर्याची 'त्सुनामी'; IPL कारकिर्दीतील ठोकले पहिले शतक

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राखीव खेळाडूंमध्ये लखनऊ संघाने स्वप्नील सिंग, डॅनिएल सॅम्स, आयुष बडोनी, दीपक हुडा आणि अर्पित गुलेरिया यांना संधी दिली आहे. हैदराबादने राखीव खेळाडूंमध्ये विवरांत शर्मा, सनवीर सिंग, मयंक डागक, नितीश कुमार रेड्डी आणि मार्को यान्सिन यांना संधी दिली आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • लखनऊ सुपर जायंट्स - क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), काईल मेयर्स, कृणाल पंड्या (कर्णधार), प्रेरक मंकड, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान

  • सनरायझर्स हैदराबाद - अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम (कर्णधार), हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, अब्दुल सामद, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com