IPL 2023: अंपायरशी भांडण क्लासेनला भोवलं! BCCI ने केली कडक कारवाई, मिश्रालाही खडसावलं

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या हेन्रिक क्लासेनवर दंडात्मक कारवाई केली आहे.
Heinrich Klaasen Amit Mishra
Heinrich Klaasen Amit Mishra Dainik Gomantak

Heinrich Klaasen fined and Amit Mishra reprimanded: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात सामना झाला. हा सामना लखनऊने 7 विकेट्सने जिंकला. पण या सामन्यानंतर बीसीसीआयने हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज हेन्रिक क्लासेनवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच लखनऊचा गोलंदाज अमित मिश्रालाही खडसावले आहे.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात कारवाईबद्दल माहिती देण्यात आली आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यादरम्यान आयपीएलच्या आचार संहितेतील नियमांचा भंग केल्या प्रकरणी क्लासेनवर सामनाशुल्काच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे, तसेच अमित मिश्राला चेतावणी दिली आहे.

प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार 'क्लासेनने आयपीएलच्या आचार संहितेतील कलम २.७ अंतर्गत लेव्हल 1 ची चूक मान्य केली आहे. हे कलम सार्वजनिक टीका किंवा अयोग्य टिप्पणीचा वापर केला जाण्याबद्दल आहे.'

Heinrich Klaasen Amit Mishra
IPL 2023: पंजाबच्या फिरकीची जादू चालली! वॉर्नरच्या फिफ्टीनंतरही दिल्ली पराभूत, प्लेऑफ शर्यतीतूनही बाहेर

दरम्यान क्लासेनने काय चूक केली ही माहिती दिलेली नसली, तरी हैदराबादच्या फलंदाजीवेळी 19 व्या षटकात नो-बॉलवरून त्याचे पंचांशी वाद झाले होते, त्याच कारणाने त्याच्यावर ही कारवाई झाल्याचे अंदाज व्यक्त होत आहेत.

झाले असे की या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून 19 व्या षटकात हेन्रिक क्लासेन आणि अब्दुल सामद फलंदाजी करत होते. तसेच लखनऊकडून गोलंदाजी करणाऱ्या आवेश खानने तिसरा चेंडू सामदविरुद्ध फुलटॉस टाकला. तो चेंडू मैदानातील पंचांकडून तो चेंडू सामदच्या कमरेच्या वर असल्याचे सांगत नो-बॉल देण्यात आला.

पण लखनऊने यावर डिसिजन रिव्ह्यू सिस्टिमची (DRS) मागणी केली. त्यावर तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहिल्यानंतर मैदानावरील पंचांचा निर्णय बदलण्यास सांगितले. मात्र, तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर सामदचा फलंदाजी साथीदार क्लासेन खूश नव्हता. तो पंचांकडे याबद्दल तक्रार करताना दिसला होता.

Heinrich Klaasen Amit Mishra
IPL Video Viral: 6,6,6,6,6... स्टॉयनिस-पूरनचा कहर, एकाच ओव्हरमध्ये 31 धावा चोपत फिरवली मॅच

मिश्रालाही खडसावलं

दरम्यान, बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात अशीही पाहिती दिली आहे की लखनऊ सुपर जायंट्सच्या अमित मिश्राला आयपीएलच्या आचार संहितेचा भंग केल्याबद्दल फटकारण्यात आले आहे. त्यानेही कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 ची चूक मान्य केली आहे. हे कलम सामन्यादरम्यान क्रिकेट संदर्भात गोष्टींचा अपमान करण्याबद्दल आहे.

मिश्राने या सामन्यात हैदराबादच्या अनमोलप्रीत सिंगला बाद केल्यानंतर जोरदार सेलिब्रेशन केले होते. अनमोलने त्याआधी मिश्राविरुद्ध षटकार ठोकला होता. त्यावेळी त्याने चेंडू जोरात जमिनिवर आदळला होता आणि अनमोलप्रीतकडे रोखून त्याने पाहिले होते. त्याच्या याच कृतीमुळे त्याला फटकारण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com