Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होत आहे. राजस्थानच्या घरच्या मैदानावर म्हणजेच सवाई मानसिंग स्टेडियमवर होत आहे.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी बेंगलोरने दोन मोठे बदल केले आहेत. त्यांनी वेन पार्नेल आणि मायकल ब्रेसवेलला जोश हेजलवूड आणि वनिंदू हसरंगा ऐवजी संघात संधी दिली आहे. याशिवाय राजस्थानने ट्रेंट बोल्ट ऐवजी ऍडम झम्पाला खेळवले आहे.
या सामन्यासाठी बेंगलोरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार फाफ डू प्लेसिससह ग्लेन मॅक्सवेल, वेन पार्नेल आणि मायकल ब्रेसबेल हे परदेशी खेळाडू आहेत. तसेच राजस्थानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जॉस बटलर, जो रुट, शिमरॉन हेटमायर आणि ऍडम झम्पा या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी ४ परदेशी खेळाडू असल्याने त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूला वापरता येणार आहे.
इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राखीव खेळाडूंमध्ये बेंगलोरने विजयकुमार वैशाख, फिन ऍलेन,शाहबाद अहमद, हिमांशू शर्मा, सुयश प्रभुदेसाई यांना संधी दिली आहे. तसेच राजस्थानने देवदत्त पडिक्कल, रियान पराग, कुलदीप यादव, दोनावन फेरिएरा आणि नवदीप सैनी यांना राखीव खेळाडूंमध्ये संधी दिली आहे.
हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, तो प्लेऑफच्या शर्यतीत आपले स्थान आणखी भक्कम करेल, पण जो संघ पराभूत होईल, त्या संघाच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल, वेन पार्नेल, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज
राजस्थान रॉयल्स - यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक / कर्णधार), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ऍडम झम्पा, संदीप शर्मा, केएम आसिफ, युझवेंद्र चहल
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.