IPL 2023: भुवनेश्वर कुमारला सुवर्णसंधी, फक्त 'हे' काम करावं लागेल!

RCB vs SRH: इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे.
Bhuvneshwar Kumar
Bhuvneshwar KumarDainik Gomantak
Published on
Updated on

RCB vs SRH: इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सर्वात अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारकडे मोठी कामगिरी करण्याची सुवर्णसंधी आहे. या सामन्यात 3 विकेट घेताच तो आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज बनणार आहे.

भुवनेश्वर कुमारला मलिंगाला मागे सोडण्याची संधी आहे

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) गेल्या 12 वर्षांपासून आयपीएलमध्ये भाग घेत आहे. 158 आयपीएल सामने खेळलेल्या भुवनेश्वरने 7.36 च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने 168 विकेट घेतल्या आहेत. तो ड्वेन ब्राव्हो आणि लसिथ मलिंगानंतर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज आहे.

Bhuvneshwar Kumar
IPL 2023 Purple Cap: 64 सामन्यांनंतर पर्पल कॅपचा बादशहा कोण? टॉप 5 मध्ये केवळ 1 विदेशी गोलंदाज

दुसरीकडे, या सामन्यात भुवनेश्वरने 3 विकेट घेतल्यास तो या यादीत लसिथ मलिंगाला मागे टाकेल. मलिंगाच्या 170 विकेट्स असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अशा परिस्थितीत, कुमार आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज बनू शकतो. त्याचबरोबर ड्वेन ब्राव्हो या यादीत अव्वल स्थानी आहे. ज्याच्या एकूण 183 विकेट्स आहेत.

Bhuvneshwar Kumar
IPL 2023: गंभीर-रहाणेच्या 'या' यादीत गब्बरची एन्ट्री, लाजिरवाणा रेकॉर्ड केला नावावर!

भुवनेश्वर कुमार फॉर्मात आहे

हैदराबादचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार यंदा उत्कृष्ट लयीत दिसत आहे. एकीकडे संघाच्या इतर गोलंदाजांनी धावा लुटल्या आहेत, तर दुसरीकडे कुमारची इकॉनॉमी 8 पेक्षा कमी आहे. या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यांमध्ये त्याने 14 बळी घेतले आहेत.

गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने 5 विकेट घेत सर्वांना आपले फॅन बनवले. मात्र, या कामगिरीनंतरही संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com