Video: बोल्टने पहिल्याच चेंडूवर किंग कोहलीला धाडलं माघारी, स्पेशल सेंच्युरीही पूर्ण

Video: राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहलीला डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले
Trent Boult | Virat Kohli
Trent Boult | Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

Trent Boult dismissed Virat Kohli: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील 32 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात रविवारी होत आहे.

एम चिन्नास्वामी स्टेडियवर सुरू असलेल्या या सामन्यात राजस्थानचा अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने खास विक्रम केला आहे.

या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून बेंगलोरला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. बेंगलोरकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी डावाची सुरुवात केली.

पण राजस्थानकडून ट्रेंट बोल्टने डावाच्या पहिल्याच षटकात विराट कोहलीला पायचीत पकडले. त्यामुळे विराटला भोपळाही न फोडता माघारी परतावे लागले. महत्त्वाचे म्हणजे ही पहिलीच वेळ होती की बोल्टने टी20 क्रिकेटमध्ये विराटला बाद केले आहे.

Trent Boult | Virat Kohli
अर्शदीपकडून IPL चे लाखोंचे नुकसान! सलग दोन बोल्ड करत तोडलेल्या स्टंपची नक्की किंमत किती?

या विकेटनंतर अनेकांना 2019 वर्ल्डकप मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या उपांत्य सामन्यातील विराटच्या विकेटचीही आठवण झाली आहे.

कारण विराट जसा रविवारी बाद झाला, तशाच प्रकारे 2019 वर्ल्डकप उपांत्य सामन्यातही झाला होता. त्यावेळीही बोल्टनेच विराटला पायचीत केले होते.

दोन्ही घटनांवेळी बोल्टने फुल लेंथला मधल्या स्टंपवर टाकलेल्या चेंडूवर विराट सारख्याच पद्धतीचा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात पायचीत झाला होता.

बोल्टच्या 100 विकेट्स

दरम्यान, विराटची विकेट ही बोल्टची आयपीएलमधील 100 वी विकेट ठरली आहे. बोल्टने विराटनंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या शाहबाज अहमदलाही बाद केले. त्यामुळे आयपीएलमध्ये 100 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा तो 22 वा खेळाडू ठरला आहे.

तसेच 6 वा परदेशी खेळाडू ठरला आहे. यापूर्वी ड्वेन ब्रावो, लसिथ मलिंगा, सुनील नारायण, राशीद खान आणि कागिसो रबाडा या परदेशी खेळाडूंनी आयपीएलमध्ये 100 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

Trent Boult | Virat Kohli
IPL 2023: नो-बॉलवर कंट्रोल करण्यासाठी वापरली 'ही' रणनीती, अर्शदीपचा खुलासा

महत्त्वाचे म्हणजे बोल्टने घेतलेल्या 101 विकेट्सपैकी 21 विकेट्स त्याने पहिल्या षटकात गोलंदाजी करताना घेतल्या आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे परदेशी खेळाडू

  • 183 विकेट्स - ड्वेन ब्रावो

  • 170 विकेट्स - लसिथ मलिंगा

  • 158 विकेट्स - सुनील नारायण

  • 124 विकेट्स - राशीद खान

  • 102 विकेट्स - कागिसो रबाडा

  • 101 विकेट्स - ट्रेंट बोल्ट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com