Faf du Plessis: जिगरबाज फाफ! जखमी पोटाला बँडेज बांधूनही फिफ्टी ठोकत CSK ला दिलेलं टेंशन

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जखमी असतानाही चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध दमदार अर्धशतक केले.
Faf du Plessis
Faf du PlessisDainik Gomantak
Published on
Updated on

Faf du Plessis Injury: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी 24 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा 8 धावांनी पराभव केला. एम चिन्नास्वामीवर झालेला हा सामना अखेरच्या षटकापर्यंत रोमांचक झाला होता. पण या सामन्यादरम्यान आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस जखमी झाला. असे असतानाही त्याने दमदार अर्धशतक केले.

जिगरबाज फाफ

या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना आरसीबीसमोर 227 धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने विराट कोहली (6) आणि महिपाल लोमरोर (0) यांच्या विकेट्स झटपट गमावल्या होत्या.

पण असे असतानाही आरसीबीकडून फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी तुफानी फलंदाजी केली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी चौकार-षटकारांची बरसात करताना 61 चेंडूत तब्बल 126 धावांची भागीदारी करत आरसीबीला सामन्यात पुनरागमन करून दिले होते.

Faf du Plessis
IPL 2023: RCB च्या होम ग्राऊंडवर धोनीच्या CSK चा रोमांचक विजय! मॅक्सवेल-डुप्लेसिसच्या झंझावाती खेळीवर फेरले पाणी

दरम्यान, या दोघांनी दमदार फलंदाजी करत असताना वैयक्तिक अर्धशतकांनाही गवसणी घातली. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या डावात फलंदाजी करत असताना फाफ जखमी होता.

38 वर्षीय फाफला पोटाच्या जवळ या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने फलंदाजी करताना स्ट्राटर्जिक टाईमआऊटच्या वेळी पोटाला बँडेजही बांधले होते. त्याने या जखमी अवस्थेत असतानाही 33 चेंडूत 62 धावांची खेळी केली. त्याला मोईन अलीने 14 व्या षटकात बाद केले. त्याचा झेल एमएस धोनीने घेतला.

त्याच्याआधी 36 चेंडूत 76 धावांची खेळी करणारा ग्लेन मॅक्सवेल महिश तिक्षणाच्या गोलंदाजीवर बाद झाला होता. त्यामुळे त्याची आणि फाफची भागीदारी तुटली. दरम्यान, मॅक्सवेलनंतर फाफही बाद झाल्यानंतर आरसीबीच्या अन्य फलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये नियमित अंतराने विकेट्स गमावल्याने संघाला विजय मिळवून देता आला नाही.

त्यामुळे आरसीबीला 20 षटकात 8 बाद 218 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना केवळ 8 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

Faf du Plessis
Video Viral: हाय व्होल्टेज सामन्यानंतर विराट-धोनीच्या फॅन्सला सुखावणारी पाहा 'माहीराट' मोमेंट

दुखापतीबद्दल फाफने दिली माहिती

दरम्यान, या सामन्यानंतर फाफने त्याच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. तो म्हणाला, 'सामन्याच्या सुरुवातीला, मी मैदानात काही वेळा सूर मारले होते. त्यावेळी माझ्या बरगड्यांच्या इथे जखम झाली. त्यामुळे थोडा त्रास होत होता.'

तसेच सामन्याबद्दल त्याने सांगितले की 'आम्ही चांगले खेळलो, अखेरची पाच षटके सामना संपवण्यासाठी होती. जर दिनेश कार्तिकने सामना संपवला असता, तर आणखी चांगले झाले असते. पण सीएसकेने चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन केले.'

'आम्ही अखेरच्या षटकांमध्ये जास्त धावा दिल्या, आम्ही त्यांना कमी धावांमध्ये रोखू शकलो असतो. अखेरची चार षटके सामना संपवण्यासाठी सर्वोत्तम असतात. ही फलंदाजांना पोषक खेळपट्टी होती. गोलंदाज म्हणून यावर तुम्हाला कौशल्य वापरावे लागते. सिराजने चांगली गोलंदाजी केली. आम्ही सामना संपवू शकलो नसलो, तरी आम्हाला यातून पुढे जावे लागेल.'

त्याचबरोबर फाफने सांगितले की फिरकीपटूंविरुद्ध त्याला चांगले खेळण्यासाठी आणखी सुधारणा कराव्या लागतील.

या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 226 धावा केल्या होत्या. सीएसकेकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 83 धावांची खेळी केली. तसेच शिवम दुबेने 52 धावांची खेळी केली. बेंगलोरकडून सिराजने सर्वोत्तम गोलंदाजी करताना 4 षटकात केवळ 30 धावा देत 1 विकेट घेतली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com