IPL 2023, Qualifier-2: रोहितने जिंकला टॉस! 'तिकीट टू फायनल'साठी मुंबई - गुजरात आमने-सामने, पाहा Playing XI

GT vs MI: आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज होणाऱ्या दुसरा क्वालिफायर सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यात पोहचेल.
GT vs MI
GT vs MIDainik Gomantak

IPL 2023 Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शुक्रवारी (२६ मे) दुसरा क्वालिफायर सामना खेळवला जात आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात गतविजेते गुजरात टायटन्स आणि पाचवेळचे विजेते मुंबई इंडियन्स आमने-सामने आहेत.

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने एक बदल केला आहे. त्यांनी हृतिक शोकिन ऐवजी कुमार कार्तिकेयला संधी दिली आहे. तसेच गुजरातने या सामन्यासाठी दोन बदल केले असून दसून शनकाऐवजी जोशुआ लिटिलला संधी दिली आहे. तसेच दर्शन नळकांडेऐवजी साई सुदर्शनला संधी दिली आहे.

GT vs MI
IPL 2023: नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर चाहत्यांमध्ये धक्काबुक्की! Video ने उडवली खळबळ

या सामन्यासाठी मुंबईने कॅमेरॉन ग्रीन, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन आणि जेसन बेऱ्हेंडॉर्फ या परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. तसेच गुजरातने प्लेइंग इलेव्हनमध्ये डेव्हिड मलिर, रशीद खान, नूर अहमद या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे.

त्यामुळे मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार परदेशी खेळाडू असल्याने त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून भारतीय खेळाडूलाच वापरता येणार आहे. तसेच गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मात्र तीनच परदेशी खेळाडू असल्याने ते इम्पॅक्ट प्लेअर म्हणून भारतीय किंवा परदेशी खेळाडूला वापरू शकतात. गुजरात जोशुआ लिटिलला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवण्याची दाट शक्यता आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी गुजरातने राखीव खेळाडूंमध्ये जोशुआ लिटिल, श्रीकर भारत, ओडियन स्मिथ, आर साई किशोर आणि शिवम मावी यांना संधी दिली आहे. तसेच मुंबईने राखीव खेळाडूंमध्ये रमनदीप सिंग, विष्णू विनोद, नेहल वढेरा, संदीप वॉरियर, राघव गोयल यांना संधी दिली आहे.

GT vs MI
IPL 2023 फायनलपूर्वी धोनीने घेतली पथिरानाच्या कुटुंबियांची भेट, 'मल्ली सुरक्षित हातात...'

या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहे. अंतिम सामना २८ मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवरच पार पडणार आहे. अंतिम सामन्यात यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सने स्थान मिळवले आहे. त्यामुळे शुक्रवारी मुबंई आणि गुजरात यांच्यात जो संघ जिंकेल, तो अंतिम सामन्यात चेन्नईविरुद्ध खेळणार आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • मुंबई इंडियन्स - ईशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधाक), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेऱ्हेंडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल

  • गुजरात टायटन्स - वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com