IPL 2023 फायनलपूर्वी धोनीने घेतली पथिरानाच्या कुटुंबियांची भेट, 'मल्ली सुरक्षित हातात...'

IPL 2023: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गुरुवारी आयपीएल 2023 फायनलपूर्वी ज्युनियर मलिंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मथिशा पथिरानाच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
MS Dhoni Meets Matheesha Pathirana Family
MS Dhoni Meets Matheesha Pathirana Family Dainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2023: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गुरुवारी आयपीएल 2023 फायनलपूर्वी ज्युनियर मलिंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मथिशा पथिरानाच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

यावेळी पथिरानाच्या बहिणीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या भेटीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. पथिरानाच्या बहिणीने एक हृदयस्पर्शी कॅप्शन देखील शेअर केले आहे.

'मल्ली सुरक्षित हातात'

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार गोलंदाज मथिशा पथिराना या आयपीएल सीझनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. बरेच लोक त्याला 'ज्युनियर मलिंगा' असेही म्हणतात.

पथिराना मात्र या कामगिरीचे श्रेय महेंद्रसिंग धोनीला देतो, ज्याने त्याच्यावर विश्वास दाखवला. अशा परिस्थितीत धोनी जेव्हा पथिरानाच्या कुटुंबीयांना भेटला तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेना.

दरम्यान, माहीसोबतच्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत पथिरानाच्या बहिणीने लिहिले की, 'आता आम्हाला खात्री आहे की, मल्ली सुरक्षित हातात आहे.' त्यानंतर, थाला लगेच म्हणाला की, ''मथिशाची काळजी करण्याची काहीच गरज नाही, तो नेहमीच माझ्यासोबत असतो."

IPL 2023 मध्ये पथिरानाची दमदार कामगिरी

इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये पथिरानाने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच वेड लावले आहे. तो बहुतांश सामन्यांमध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळतो. त्याने आतापर्यंत 11 सामन्यात 7.72 च्या सरासरीने 17 बळी घेतले आहेत. पथिरानाची सर्वोत्तम कामगिरी मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) होती. ज्यामध्ये त्याने 17 धावांत 3 महत्त्वाच्या विकेट घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com