IPL 2023 Orange Cap: ऑरेंज कॅपवर फाफ डू प्लेसिसचा कब्जा, पाहा कोण कोण आहे शर्यतीत?

IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत 64 सामने खेळले गेले आहेत. 64 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला.
Faf Du Plessis
Faf Du PlessisDainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत 64 सामने खेळले गेले आहेत. 64 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये दिल्ली संघाने 15 धावांनी दणदणीत विजय नोंदवला.

मात्र, या सामन्याचा ऑरेंज कॅपच्या शर्यतीवर कोणताही परिणाम झाला नाही. यंदाच्या मोसमात ऑरेंज कॅपसाठी 5 फलंदाजांमध्ये लढत आहे.

फाफ डू प्लेसिस अव्वल स्थानावर आहे

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत 64 सामन्यांनंतर, RCB कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) 12 सामन्यांत 631 धावांसह अव्वल आहे, तर गुजरात टायटन्सचा शुभमन गिल 13 सामन्यांत 571 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Faf Du Plessis
IPL 2023 Purple Cap: 64 सामन्यांनंतर पर्पल कॅपचा बादशहा कोण? टॉप 5 मध्ये केवळ 1 विदेशी गोलंदाज

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोण कोण सामील आहेत?

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) स्टार फलंदाज यशस्वी जैस्वाल ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या युवा सलामीवीर फलंदाजाने या मोसमात शानदार प्रदर्शन केले असून 13 सामन्यांत 575 धावा करत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मोसमात त्याने शतकही केले आहे, एका डावात 99 धावा करुन त्याचे शतक हुकले.

Faf Du Plessis
IPL 2023: तिकडे वडिलांना ICU मधून बाहेर काढलं अन् इकडे मोहसिन मुंबईविरुद्ध ठरला लखनऊचा हिरो

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप 5 फलंदाजांचा समावेश आहे

631-धावा, फाफ डुप्लेसिस (RCB), सामना 12

576- धावा, शुभमन गिल (GT) सामना 13

575- धावा, यशस्वी जैस्वाल (आरआर)

498- धावा, डेव्हॉन कॉनवे (CSK)

486- धावा, सूर्यकुमार यादव (MI)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com