Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत रविवारी पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात होणार आहे. हा हंगामातील 69 वा सामना असून मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी मुंबईने हृतिक शोकिन ऐवजी कुमार कार्तिकेयला संघात संधी दिली आहे. तसेच सनरायझर्स हैदराबाद संघात मयंक अगरवालचे पुनरागमन झाले आहे. तसेच विवरांत शर्मालाही संधी देण्यात आली आहे. याशिवाय मयंक मार्कंडे, अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी हे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाले आहेत.
या सामन्यासाठी मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कॅमेरॉन ग्रीन, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन आणि जेसन बेऱ्हेंडॉर्फ या परदेशी खेळाडूंना संधी देण्यात आली असून हैदराबादने प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार एडेन मार्करमबरोबरच हेन्रिक क्लासेन, हॅरी ब्रुक आणि ग्लेन फिलिप्स या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे.
त्यामुळे दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी ४ परदेशी खेळाडू असल्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्यांना भारतीय खेळाडूंनाच वापरता येणार आहे.
इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी हैदराबादने राखीव खेळाडूंमध्ये मयंक मार्कंडे, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, अकिल हुसेन आणि अब्दुल सामद यांना निवडले आहे, तर मुंबईने राखीव खेळाडूंमध्ये रमनदीप सिंग, विष्णू विनोद, ट्रिस्टन स्टब्स, तिलक वर्मा आणि संदीप वॉरियर यांची निवड केलेली आहे.
सनरायझर्स हैदराबादचा हा या हंगामातील अखेरचा सामना आहे. त्यांचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. पण मुंबई प्लेऑफच्या शर्यतीत असून त्यांना त्यांचे आव्हान मजबूत ठेवायचे असेल, तर या सामन्यात विजय गरजेचाच आहे.
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेऱ्हेंडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल.
सनरायझर्स हैदराबाद - मयंक अगरवाल, विवरांत शर्मा, एडेन मार्कराम (कर्णधार), हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक, नितीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.