Video: शेवटच्या दोन बॉलवर धोनीचा घणाघात! सलग सिक्स ठोकत CSK ला केले 200 पार...

Video: रविवारी पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात फिनिशर धोनी सर्वांना पाहायला मिळाला.
MS Dhoni
MS DhoniDainik Gomantak
Published on
Updated on

MS Dhoni two sixes in last two balls: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी 41 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात सुरू आहे. या सामन्यात चेन्नईने पंजाबसमोर विजयसाठी 201 धावांचे आव्हान ठेवले आहे. दरम्यान, चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीचा फिनिशिंग टच या सामन्यातही पाहायला मिळाला.

चेन्नईने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार चेन्नईने सुरुवात चांगली केली होती. तसेच सलामीला खेळायला आलेला डेव्हॉन कॉनवेही शानदार खेळत अखेरपर्यंत नाबाद राहिला. दरम्यान सॅम करनने गोलंदाजी केलेल्या अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रविंद्र जडेजा 12 धावांवर बाद झाला.

MS Dhoni
IPL साठी ऐतिहासिक क्षण, 1000 व्या सामन्यात भिडणार मुंबई आणि राजस्थान!

त्यामुळे धोनी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याला या षटकातील दुसऱ्या चेंडूवर एकही धाव काढता आली नाही. तिसऱ्या चेंडूवर त्याने कॉनवेसह एक धाव पूर्ण केली. चौथ्या चेंडूवर कॉनवेला बाद होण्यापासून वाचला, त्यामुळे यावर एकच धाव निघाली. यानंतर मात्र फिनिशर धोनी सर्वांना पाहायला मिळाला.

धोनीने करनविरुद्ध अखेरच्या दोन चेंडूवर सलग दोन षटकार मारले. त्याने पाचव्या चेंडूवर बॅकवर्ड पाँइंटच्या दिशेने षटकार मारला, तर अखेरच्या चेंडूवर धोनीने मिडविकेटला खणखणीत षटकार खेळला. त्यामुळे चेन्नईने 20 षटकात 4 बाद 200 धावा केल्या. धोनी 4 चेंडूत 13 धावा करून नाबाद राहिला. तसेच कॉनवेचे शतक मात्र केवळ 8 धावांनी राहिले. तो 52 चेंडूत 92 धावांवर नाबाद राहिला.

पंजाबकडून सॅम करन, अर्शदीप सिंग, राहुल चाहर आणि सिकंदर रझा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

MS Dhoni
IPL 2023: मार्कंडेच्या कॅचने फिरवली मॅच! धोकादायक सॉल्टला असं केलं आऊट, पाहा Video

दरम्यान, धोनीने डावाच्या अखेरच्या अखेरच्या षटकात षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ नाही. याच हंगामात धोनीने यापूर्वीही अनेकदा अखेरच्या षटकांमध्ये षटकार मारण्याचा कारनामा केला आहे. त्याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धही असेच मार्क वूडच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार मारले होते. त्यामुळे यंदा चाहत्यांना धोनीमधील नेहमीच्या फिनिशर भूमिकेचे दर्शन होत आहे.

चेन्नईच्या या हंगमातील कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास पंजाबविरुद्धचा हा सामना चेन्नईचा या हंगामातील 9 वा सामना आहे. चेन्नईने आत्तापर्यंत 8 सामने खेळले असून 5 सामने जिंकले आहेत, तसेच 3 सामने पराभूत झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com