IPL 2023: कोण आहे सुयश शर्मा? ज्यानं RCB विरुद्ध 3 विकेट्स घेत वेधलं लक्ष

गुरुवारी आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध तीन विकेट्स घेत 19 वर्षीय सुयश शर्माने सर्वांचे लक्ष वेधले.
Suyash Sharma
Suyash SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Know About Suyash Sharma: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमधून आजपर्यंत अनेक युवा खेळाडू भारताला मिळाले आहेत. आयपीएल युवा खेळाडूंसाठी असा एक स्टेज आहे, ज्यातून त्यांना आपल्यातील प्रतिभेची चुणूक दाखवता येते. नुकतेच गुरुवारी अशाच एका 19 वर्षीय फिरकीपटू सुयश शर्माने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले.

गुरुवारी आयपीएल 2023 स्पर्धेतील नववा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात रंगला. या सामन्यात केकेआरने दिलेल्या 205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आरसीबी उतरली असताना केकेआरने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सुयश शर्माला वेंकटेश अय्यरच्या जागेवर संधी दिली.

Suyash Sharma
Shahrukh Khan Viral Video : KKR जिंकताच पठाण थिरकला...शाहरुखने या खेळाडू ला ग्राऊंडवरच शिकवल्या स्टेप्स...

त्यामुळे सुयशचे आयपीएल पदार्पणही झाले. दरम्यान, केकेआरकडून सुनील नारायण आणि वरूण चक्रवर्तीने सुरुवातीला आरसीबीला धक्के दिल्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळायला उतरलेल्या सुयश शर्मानेही पदार्पणात प्रभावी कामगिरी करताना दिनेश कार्तिक (9), अनुज रावत (1) आणि कर्ण शर्मा (1) यांच्या विकेट्स घेतल्या. त्यामुळे आरसीबीला 17.4 षटकातच 123 धावांवर सर्वबाद करण्यात यश मिळवले.

सुयशच्या या कामगिरीमुळे त्याने सर्वांचेच लक्ष वेधले. विशेष म्हणजे सुयशसाठी हा प्रोफेशनल कारकिर्दीतील देखील पहिलाच सामना होता. सुयश दिल्लीचा असून त्याने क्लब क्रिकेट खेळले आहे. त्याला केकेआरच्या स्काऊटने ट्रायल्समधून शोधले आहे. त्याने ट्रायल्समधून केकेआरच्या स्काऊटमधील सदस्यांना प्रभावित केले होते.

त्यामुळे आयपीएल 2023 लिलावात केकेआरने त्याच्यावर 20 लाखांची बोली लावत त्याला संघात सामील करून घेतले होते.

Suyash Sharma
KKR vs RCB सामन्यात स्पिनर्सचाच डंका! IPL इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी घटना

त्याच्याबद्दल केकेआरचा कर्णधार नितीश राणा म्हणाला, 'सुयश आत्मविश्वासाने भरलेला युवा खेळाडू आहे. त्याचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याने त्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेतला. त्याला गोलंदाजी करताना पाहून चांगले वाटले.'

तसेच केकेआरचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी सांगितले की 'आम्ही त्याला ट्रायल मॅचेसमध्ये पाहिले होते आणि आम्ही त्याने ज्याप्रकारे गोलंदाजी केली ते पाहून खूश होतो. तो हवेत वेगात चेंडू फिरवतो, त्याचा चेंडू खेळणे अवघड आहे. तो अननुभवी आहे, पण त्याच्यात आत्मविश्वास आहे.'

दरम्यान, गुरुवारी झालेल्या सामन्यात केकेआरकडून सुयश व्यतिरिक्त वरुण चक्रवर्तीने 4 विकेट्स घेतल्या, तसेच सुनील नारायणने 2 विकेट्स आणि शार्दुल ठाकूरने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी केकेआरने प्रथम फलंदाजी करताना रहमनुल्लाह गुरबाज (57), शार्दुल ठाकूर (68) आणि रिंकू सिंग (46) यांच्या फलंदाजीच्या जोरावर 20 षटकात 7 बाद 204 धावा केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com