KL Rahul @7000! विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडत पटकावला अव्वल क्रमांक

गुजरात टायटन्सविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने अर्धशतकी खेळी करण्याबरोबरच विराट कोहलीच्या मोठ्या विक्रमाला मागे टाकले आहे.
KL Rahul
KL RahulDainik Gomantak
Published on
Updated on

KL Rahul Completes 7000 T20 Runs: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी (22 एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना झाला. या सामन्यात गुजरातने 7 धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यात लखनऊकडून कर्णधार केएल राहुलने अर्धशतकी खेळी करताना एका मोठ्या वैयक्तिक विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात गुजरातने लखनऊसमोर 136 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊकडून सलामीला खेळायला आलेल्या केएल राहुलने 61 चेंडूत 8 चौकारांसह 68 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान केएल राहुलने टी20 क्रिकेट कारकिर्दीत 7 हजार धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला.

त्याच्या नावावर आता 210 टी20 सामन्यातील 197 डावात 42.49 च्या सरासरीने तसेच 6 शतके आणि 61 अर्धशतकांसह 7054 धावांची नोंद झाली आहे. त्यामुळे तो 7000 टी20 धावा करणारा सातवा भारतीय ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, एमएस धोनी, रॉबिन उथप्पा आणि शिखर धवन यांनी असा विक्रम केला आहे.

KL Rahul
KL Rahul: 'अप्रतिम खेळी...', टीममधून काढा म्हणणाऱ्या वेंकटेशकडूनच केएलला कौतुकाचा 'प्रसाद'

केएल राहुलने विराटला टाकले मागे

दरम्यान, केएल राहुलने 197 टी20 डावातच 7000 धावा केल्या असल्याने तो सर्वात जलद हा कारनामा करणारा भारतीय क्रिकेटपटूही ठरला आहे. यापूर्वी सर्वात जलद 7000 टी20 धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. त्याने 212 टी20 डावात 7000 धावा केल्या होत्या. पण आता विराटचा हा विक्रम केएल राहुलने मोडला आहे.

याशिवाय केएल राहुल हा टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 7000 धावा करणाऱ्या जगातील एकूण क्रिकेटपटूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर बाबर आझम असून दुसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल आहे. बाबरने 187 डावात 7000 टी20 धावा केल्या होत्या, तर ख्रिस गेलने 192 टी20 डावात 7000 धावांचा पल्ला गाठला होता.

सर्वात जलद 7000 टी20 धावा करणारे भारतीय

  • 197 डाव - केएल राहुल

  • 212 डाव - विराट कोहली

  • 246 डाव - शिखर धवन

  • 251 डाव - सुरेश रैना

  • 258 डाव - रोहित शर्मा

  • 271 डाव - रॉबिन उथप्पा

KL Rahul
IPL 2023: स्टोक्स कधी करणार कमबॅक? CSK कोचकडून महत्त्वाचे अपडेट्स, धोनीच्या दुखापतीबद्दलही सांगितले

गुजरातने मिळवला विजय

गुजरातने शनिवारी प्रथम फलंदाजी करताना कर्णधार हार्दिक पंड्या (66) आणि वृद्धिमान साहा (47) यांच्या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 135 धावा केल्या होत्या. त्यानंतर लखनऊकडून केएल राहुलने अर्धशतकी खेळी केली. पण अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही.

त्यातच लखनऊने मोहित शर्माने गोलंदाजी केलल्या अखेरच्या षटकात सलग 4 चेंडूत चार विकेट्स गमावल्या. केएल राहुल आणि मार्कस स्टॉयनिस लागोपाठच्या चेंडूवर झेलबाद झाले, तर आयुष बदोनी आणि दीपक हुडा धावबाद झाले. त्यामुळे लखनऊला 20 षटकात 7 बाद 128 धावाच करता आल्या.

दरम्यान, या सामन्यात दोन्ही संघाच्या गोलंदाजांकडून चांगली कामगिरी झाली. गुजरातकडून नूर अहमदने शानदार गोलंदाजी करताना 4 षटकात 18 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तसेच मोहितने 3 षटकात 17 धावांत 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय राशीद खानने 1 विकेट घेतली. मोहम्मद शमीला विकेट मिळाली नाही, पण त्यानेही शानदार गोलंदाजी करताना 3 षटकात केवळ 18 धावाच खर्च केल्या.

तसेच लखनऊकडून कृणाल पंड्याने 4 षटकात 16 धावांत 2 विकेट्स घेतल्या. तसेच मार्कस स्टॉयनिसने 20 धावांत 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर नवीन उल हकने 19 धावांत 1 विकेट घेतली, तर अमित मिश्राने 9 चेंडूत 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com