IPL 2023: आज कोलकाता विजयाची हॅट्रिक साधणार की मार्करमचा हैदराबाद बाजी मारणार?

आयपीएल २०२३ मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना होणार आहे.
KKR vs SRH
KKR vs SRHDainik Gomantak
Published on
Updated on

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स संघात सामना रंगणार आहे. हा सामना कोलकातामधील इडन गार्डन्स स्टेडियमवर होणार असून संध्याकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.

या सामन्यात उतरताना रिंकू सिंगच्या अफलातून खेळीमुळे कोलकाता संघाचा आत्मविश्वास वाढलेला असेल. त्यामुळे कोलकाता संघ सलग तीन सामने जिंकून हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करतील. तर हैदराबादनेही मागील सामन्यात पंजाबला पराभवाचा धक्का दिला आहे. त्यानंतर आता ते विजयाची लय कायम राखण्याच्या हेतूने मैदानात उतरतील.

KKR vs SRH
IPL 2023: विकेटकिपर साहाची चतुराई अन् पंजाबचा फलंदाज बाद, कॅप्टन पंड्याही झाला खूश, पाहा Video

कोलकता संघाची यंदाच्या स्पर्धेतील सुरुवात पराभवाने झाली होती; मात्र त्यानंतर दोन सामन्यात विजय मिळवताना त्यांना दोन अनपेक्षित हिरो गवसले आहेत. बंगळूरविरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरने फलंदाजीत कमाल केली होती. त्याच्या 29 चेंडूतील 68 धावांच्या खेळीमुळे कोलकताने 81 धावांनी स्पर्धेतला पहिला सामना जिंकला होता.

त्यानंतर गुजरातविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूपर्यंत त्यांचा पराभव निश्चित होता; परंतु पुढच्या पाच चेंडूंत पाच षटकार मारून रिंकून सिंगने संघाला अनपेक्षित विजय मिळवून दिला. गतविजेत्यांना पराभूत केल्यामुळे कोलकता संघ सध्या विजयी अश्वावर स्वार झाला आहे. अशा परिस्थितीत उद्या हैदराबाविरुद्ध विजय मिळवणे त्यांना कठीण जाणार नाही, असे चित्र आहे.

नियमित कर्णधार श्रेयस अय्यर आणि बांगलादेशचा अष्टपैलू शकिब अल हसन यांच्या अनुपस्थितीत कोलकता संघ कमजोर झाला अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यातच ‘पॉवर हिटर’ आंद्र रसेल आणि हंगामी कर्णधार नितीन राणा हेसुद्धा अपयशी ठरत आहेत. अशा परिस्थितीत कोलकता संघाला अनपेक्षित हिरो सापडत असल्याने हा संघ आता धोकादायक ठरत आहे. शार्दुल आणि रिंकू सिंग यांच्यामुळे त्यांची फलंदाजी खोलवर झाली आहे आणि कोणत्याही स्थितीत सामना जिंकून देण्याची क्षमता आता वाढली आहे.

रसेलने पहिल्या सामन्यात 19 चेंडूत 35 धावा केल्यानंतर पुढच्या दोन सामन्यांत संघाला गरज असताना तो 0 आणि 1 एवढ्याच धावा करू शकला होता. आज होणाऱ्या सामन्यासाठी त्याने आज नेटमध्ये कसून सराव केला त्यामुळे हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याची बॅट तळपण्याची शक्यता आहे.

KKR vs SRH
IPL 2023: CSK साठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी, चाहते 'या' अपडेटने खूश!

हॅरी ब्रुककडून अपेक्षा

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा हॅरी ब्रुक हा इंग्लंडचा मधल्या फळीतील अतिशय फटकेबाज फलंदाज म्हणून ओखळला जातो. कसोटी सामन्यांतही तो भलतीच आक्रमक फलंदाजी करतो; परंतु आयपीएलमध्ये 13.25 मिळणाऱ्या या फलंदाजाला आत्तापर्यंत 13, 2 आणि 13 अशाच धावा करता आल्या आहेत.

आजच्या सामन्यात त्याच्याकडून निश्चितच अपेक्षा असतील. कदाचित त्याला सलामीलाही पाठवण्यात येऊ शकते. कोलकताच्या धोकादायक फलंदाजीला रोखण्यासाठी हैदराबादच्या वॉशिंग्टन सुंदर आणि मयांर मार्कंडे या फिरकी; तर भुवनेश्वरकुमार आणि मार्को यान्सेन यांना प्रभाव पाडावा लागणार आहे.

सलामीचा प्रश्न

गेल्यावर्षीही कोलकता संघाने सलामीच्या जोडीत अनेक प्रयोग केले होते. त्याचा फटका त्यांना बसला होता. यावेळीही तीन सामन्यात दोन वेगवेगळ्या जोड्या खेळवल्या. आजच्या सामन्यात रेहमतुल्ला गुरबाझऐवजी इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जेसन रॉयला संधी मिळू शकते. शकिब अल हसनचा बदली खेळाडू म्हणून रॉयची निवड करण्यात आली आहे.

एडन मार्करम कर्णधार असलेल्या हैदरबाद संघात हॅरी ब्रुक, मयांक अगरवाल आणि हेन्रिक क्लासेन असे फलंदाज असल्याने कागदावर तरी त्यांची फलंदाजी सरस दिसत आहे. प्रत्यक्ष मैदानावर मात्र त्याचे रूपांतर त्यांना करता आलेले नाही. राहुल त्रिपाठीच्या ४८ चेंडूतील ७४ धावांमुळे हैदराबादने पंजाबचा पराभव करून यंदाच्या स्पर्धेतला पहिला विजय मिळवला होता; मात्र आजची लढाई त्यांच्यासाठी सोपी नसेल.

संभाव्य संघ -

  • कोलकाता नाईट रायडर्स - जेसन रॉय, एन जगदीशन (यष्टीरक्षक), नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नारायण, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, वरूण चक्रवर्ती.

  • सनरायझर्स हैदराबाज - मयंक अगरवाल, हॅरी ब्रुक, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम (कर्णधार), हेन्रीक क्लासेन, अब्दुल सामद, वॉशिंग्टन सुंदर, मयंक मार्कंडे, मार्को यान्सिन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com