IPL 2023: सॅमसनच्या फटकेबाजीनंतर हेटमायरची फिनिशिंग! राजस्थानचा गुजरातला पराभवाचा धक्का

आयपीएल २०२३ स्पर्धेत रविवारी राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला अखेरच्या षटकात पराभूत केले.
Rajasthan Royals
Rajasthan RoyalsDainik Gomantak
Published on
Updated on

Gujarat Titans vs Rajasthan Royals: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी 23 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या या सामन्यात राजस्थानने 3 विकेट्सने विजय मिळवला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने राजस्थानसमोर १७८ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान राजस्थानने 19.2 षटकात 7 बाद 179 धावा करत सहज पूर्ण केले. हा राजस्थानचा चौथा विजय ठरला आहे.

Rajasthan Royals
IPL 2023: वेंकटेश अय्यरचा MI विरुद्ध शतकी धमाका! 'हा' कारनामा करणारा बनला दुसराच क्रिकेटर

राजस्थानने या सामन्यात 178 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल (1) आणि जोस बटलर (0) यांच्या विकेट्स लवकर गमावल्या होत्या. पण नंतर कर्णधार संजू सॅमसनने देवदत्त पडिक्कलबरोबर फलंदाजी करताना डाव सावरला. मात्र पडिक्कल चांगल्या सुरुवातीनंतर 26 धावांवर बाद झाला. पाठोपाठ रियान परागही 5 धावा करून माघारी परतला.

पण, नंतर सॅमसनने शिमरॉन हेटमायरला साथीला घेत तुफानी फलंदाजी केली. या दोघांनी 27 चेडूंत 59 धावांची भागीदारी केली. त्यामुळे राजस्थानने सामन्यात पुनरागमन केले. पण त्यांची भागीदारी रंगत असताना सॅमसनला नूर अहमदने बाद केले. सॅमसनने 32 चेंडूत 60 धावा केल्या. या अर्धशतकी खेळीत त्याने 3 चौकार आणि 6 षटकार मारले.

पण, तो बाद झाल्यानंतरही हेटमायर आणि ध्रुव जुरेलने सामना हातातून निसटणार नाही याची काळजी घेताना 20 चेंडूत 47 धावांची आक्रमक भागीदारी रचली. जुरेल 19 व्या षटकात 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या आर अश्विनने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमण केले आणि तो 3 चेंडूतच 10 धावा करून 19 व्या षटकातच बाद झाला.

अखेर शिमरॉन हेटमायरने 20 व्या षटकात अर्धशतक पूर्ण केल्यानंतर षटकार खेचत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हेटमायरने 26 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 56 धावांची खेळी केली.

गुजरातकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच राशीद खानने 2 विकेट्स घेतल्या, तर हार्दिक पंड्या आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Rajasthan Royals
IPL 2023: गोंधळच गोंधळ! एका कॅचसाठी तिघं धावले अन् शेवटी बॉलरनंच पकडला बॉल, पाहा Funny Video

तत्पूर्वी, या सामन्यात राजस्थानने नाणेफेर जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. गुजरातकडून वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल सलामीला फलंदाजीला उतरले होते. पण साहाला ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात झेलबाद केले. त्याचा झेल घेताना सॅमसन, जुरेल आणि हेटमायर तिघेही एकाचवेळी पळत आल्याने मोठा गोंधळ झाला होता. पण बोल्टने प्रसंगावधान राखत तो चेंडू झेलला. त्यामुळे साहा 4 धावांवर बाद झाला.

त्यानंतर साई सुदर्शनने गिलची चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला. पण तो 20 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या आणि गिल यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. पण त्यांची जोडी ११ व्या षटकात युजवेंद्र चहलने तोडली. त्याने हार्दिकला 28 धावांवर बाद केले.

त्यानंतर गुजरातची धावगती कमी झाली होती. 16 व्या षटकात गिल 45 धावांवर बाद झाला. तो बाद झाल्यानंतर अभिनव मनोहरने काही आक्रमक फटके खेळत 13 चेंडूत 27 धावांची छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली.

अखेरीस डेव्हिड मिलरने आक्रमण केले. पण तो आणि रशीद खान अखेरच्या षटकात बाद झाले. मिलरने 30 चेंडूत 46 धावांची खेळी केली. तर रशीद 1 धाव करून धावबाद झाला. त्यामुळे गुजरातला 20 षटकात 7 बाद 177 धावा करता आल्या.

राजस्थानकडून संदीप शर्माने 2 विकेट्स घेतल्या. तसेच ट्रेंट बोल्ट, ऍडम झम्पा आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com