IPL 2023: 'पापा, पापा...', कॅप्टन कूलने षटकार मारताच लेकीने मारली शिट्टी; पाहा Video

IPL 2023: आयपीएल 2023 चा 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे.
Mahendra Singh Dhoni
Mahendra Singh Dhoni Dainik Gomantak

IPL 2023: आयपीएल 2023 चा 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकात 8 गडी गमावून 168 धावा केल्या.

कर्णधार एमएस धोनीने 9 चेंडूत 20 धावा काढल्या. यादरम्यान माहीने 2 तूफानी षटकारही मारले. यातच, लेक जिवा धोनीच्या षटकारावर शिट्टी वाजवताना दिसली. तिचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

वास्तविक, एमएस धोनी 8 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने शेवटच्या 2 षटकांमध्ये शानदार फटकेबाजी करत संघाला 167 धावांपर्यंत नेले. चेन्नई हा सामना त्यांच्या होम ग्राऊंडवर खेळत आहे, तो पाहण्यासाठी कॅप्टन कूलचे कुटुंबीयही उपस्थित आहे.

Mahendra Singh Dhoni
IPL 2023: अंबाती रायडूने केला खास रेकॉर्ड, 'या' दिग्गजांच्या विशेष क्लबमध्ये झाला सामील!

दिल्लीला विजयासाठी 168 धावांची गरज आहे

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्यांदा खेळताना CSK ने 20 षटकात 8 गडी गमावून 167 धावा केल्या आहेत. शिवम दुबेने 12 चेंडूत 25 धावा केल्या.

त्याने 3 षटकार मारले. CSK च्या डावात एकूण 10 चौकार आणि 7 षटकार मारले गेले. आता दिल्लीला सामना जिंकण्यासाठी 168 धावा करायच्या आहेत.

Mahendra Singh Dhoni
MI vs RCB IPL 2023: वानखेडेवर सुर्याचा जलवा! बेंगलोरवर एकतर्फी विजयासह मुंबईची पॉइंट्स टेबलमध्येही मोठी झेप

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज - ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कॅन्डर व विकेट), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तिक्षणा.

दिल्ली कॅपिटल्स - डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), मिचेल मार्श, रिले रोसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, रिपल पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com