Ambati Rayudu IPL 2023: अंबाती रायडूने केला खास रेकॉर्ड, 'या' दिग्गजांच्या विशेष क्लबमध्ये झाला सामील!

IPL 2023: आयपीएल 2023 चा 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे.
Ambati Rayudu
Ambati Rayudu Dainik Gomantak

IPL 2023, Ambati Rayudu 200th Match: आयपीएल 2023 चा 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात अंबाती रायडूने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

मैदानावर पाऊल ठेवताच आयपीएलमध्ये 200 सामने खेळणारा तो 9 वा क्रिकेटपटू ठरला आहे. तो आता महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांच्या विशेष क्लबमध्ये सामील झाला आहे.

IPL मध्ये 200 सामने खेळलेल्या खेळाडूंची यादी

महेंद्रसिंग धोनी - 246

दिनेश कार्तिक - 240

रोहित शर्मा (Rohit Sharma) - 238

विराट कोहली - 234

रवींद्र जडेजा - 222

Ambati Rayudu
IPL 2023: पाथिराना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरणार? असे आहेत चेन्नई - दिल्लीचे Playing XI

शिखर धवन - 214

सुरेश रैना - 205

रॉबिन उथप्पा - 205

अंबाती रायुडू - 200

अंबाती रायुडूची आयपीएल कारकीर्द

अंबाती रायडू (Ambati Rayudu) 37 वर्षांचा आहे. त्याने 200 सामन्यांमध्ये 4303 धावा केल्या आहेत. या लीगमध्ये त्याने 1 शतक आणि 22 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने 170 षटकार आणि 357 चौकार मारले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com