Video: 'कोणी नो-बॉलबद्दल विचारू नका...', धोनीनेच उडवली CSK च्या युवा बॉलरची खिल्ली

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी आपल्याच संघातील युवा गोलंदाजाची नो-बॉलवरून मस्करी करताना दिसला आहे.
MS Dhoni trolls Rajvardhan Hangargekar
MS Dhoni trolls Rajvardhan HangargekarDainik Gomantak
Published on
Updated on

MS Dhoni trolls Rajvardhan Hangargekar: भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेदरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी आपल्याच संघातील युवा गोलंदाज राजवर्धन हंगारगेकरची मस्करी करताना दिसला आहे.

झाले असे की सीएसकेच्या एका प्रमोशनल कार्यक्रमासाठी धोनीसह ड्वेन ब्रावो आणि राजवर्धन हंगारगेकर उपस्थित राहिले होते. हा राजवर्धनचा सीएसकेसाठी अशाप्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहाण्याचा पहिला अनुभव होता. या कार्यक्रमादरम्यानची एक क्लिप सीएसकेने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

MS Dhoni trolls Rajvardhan Hangargekar
IPL 2023: रहाणेने CSK साठी फक्त फिफ्टीच मारली नाही, तर 'हे' 3 मोठे विक्रमही केले नावावर

या व्हिडिओत दिसते की धोनी सांगत आहे की राजवर्धनचा हा पहिलाच कार्यक्रम असल्याने त्याने आवरायला सर्वात जास्त वेळ घेतला. त्यानंतर राजवर्धनला या कार्यक्रमाबद्दल विचारण्यात येते, तेव्हा तो सांगतो की धोनीने सांगितले की जेवढे शक्य होईल, तेवढा हा कार्यक्रम मजेशीर करू.

त्यानंतर लगेचच धोनी त्याची मस्करी करताना म्हणतो की 'खरंतर त्याला म्हणायचंय की कोणीही त्याच्या नो-बॉलबद्दल विचारू नका.' त्यावर राजवर्धनसह सर्वजण हसायला लागतात. या व्हिडिओवर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

MS Dhoni trolls Rajvardhan Hangargekar
बेंगलोरच्या KGF ची कमाल! फिफ्टी ठोकत IPL मध्ये पहिल्यांदाच केलाय 'असा' पराक्रम

खरंतर राजवर्धनने आयपीएल 2023 मध्ये सीएसकेकडून पहिल्या सामन्यांमध्ये नो-बॉल टाकला होता. तसेच दुसऱ्या सामन्यात सीएसकेच्या गोलंदाजांनी 13 वाईड आणि 3 नो बॉल टाकले होते. त्यामुळे धोनीने सामन्यानंतर गोलंदाजांना वॉर्निंगही दिली होती की जर ते असेच अतिरिक्त चेंडू टाकत राहिले, तर त्यांना दुसऱ्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळावे लागेल.

त्यानंतर मात्र मुंबई इंडियन्सविरुद्ध हंगामातील तिसरा सामना खेळताना सीएसकेच्या गोलंदाजांनी एकही नो बॉल टाकला नाही, तसेच केवळ 5 चेंडू वाईड गेले.

दरम्यान, सीएसकेने आत्तापर्यंत आयपीएल 2023 मध्ये तीन सामने खेळले असून गुजरात टायटन्सविरुद्धचा पहिला सामना पराभूत झाला आहे. पण नंतर लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. सध्या सीएसके गुणतालिकेत 4 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com