IPL 2023: केकेआरला मोठा झटका, मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार नाही 'हा' डॅशिंग खेळाडू!

Mumbai Indians VS Kolkata Knight Riders: आयपीएल 2023 चा 22 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.
Kolkata Knight Riders
Kolkata Knight RidersDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Indians VS Kolkata Knight Riders: आयपीएल 2023 चा 22 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.

या सामन्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. संघाचा मोठा मॅच विनर खेळाडू या सामन्यातून बाहेर पडू शकतो. केकेआरच्या शेवटच्या सामन्यात या खेळाडूला दुखापत झाली होती.

केकेआर संघाला मोठा धक्का बसला

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात डॅशिंग अष्टपैलू आंद्रे रसेलचे खेळणे संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान आंद्रे रसेलला दुखापत झाली आणि त्याने सामन्याच्या मध्यातच मैदान सोडले.

डावातील 19वे षटक टाकण्यासाठी आलेल्या रसेलला पहिला चेंडू टाकल्यानंतर त्याच्या पायात कळ जाणवली. यानंतर तो वेदनेने आक्रोश करत सपोर्ट स्टाफसोबत मैदानाबाहेर गेला.

Kolkata Knight Riders
IPL 2023: केएल राहुल 4 हजारी मनसबदार! गेल-वॉर्नरला मागे टाकत या रेकॉर्डमध्ये गाठला 'पहिला नंबर'

हैदराबादविरुद्ध ताकद दाखवली

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आंद्रे रसेलने शानदार कामगिरी केली होती. दुखापतीमुळे मैदानाबाहेर जाण्यापूर्वी आंद्रे रसेलने 2.1 षटके टाकली आणि 3 बळी घेतले.

अशा परिस्थितीत रसेलसारख्या मोठ्या मॅचविनरशिवाय मैदानात उतरणे कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी मोठा धक्का ठरु शकतो.

Kolkata Knight Riders
IPL 2023: ...म्हणून शिखर धवन लखनऊविरुद्धच्या मॅचला मुकला, सॅम करनकडे पंजाबची कॅप्टन्सी

आयपीएल 2023 साठी कोलकाता नाइट रायडर्स संघ:

नितीश राणा (कर्णधार), जेसन रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, टीम साऊदी, उमेश यादव (Umesh Yadav), अनुकुल रॉय, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, रहमानउल्ला गुरबाज, हर्षित राणा, लिटन दास, कुलवंत दास, कुलवंत राणा, सुयश शर्मा, नारायण जगदीशन, वैभव अरोरा, डेव्हिड व्हीजे, मनदीप सिंग, आर्या देसाई.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com