IPL 2023: ...म्हणून शिखर धवन लखनऊविरुद्धच्या मॅचला मुकला, सॅम करनकडे पंजाबची कॅप्टन्सी

शनिवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात शिखर धवन ऐवजी सॅम करन पंजाब किंग्सचे नेतृत्व करत आहे.
Shikhar Dhawan | Sam Curran
Shikhar Dhawan | Sam CurranDainik Gomantak
Published on
Updated on

Shikhar Dhawan Injury: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) खेळवण्यात येत आहे. या दिवसाचा दुसरा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात खेळवण्यात येत आहे.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकली असून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, नाणेफेकीवेळी पंजाबचा कर्णधार म्हणून शिखर धवन ऐवजी सॅम करनला आलेले पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.

पण सॅम करनने नाणेफेकीनंतर शिखर धवनबद्दल महत्त्वाची अपडेट दिली आहे. त्याने सांगितले की 'शिखरला मागच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली आहे. त्याच्या दुखापत किती गंभीर आहे, हे माहिती नाही, पण आशा आहे की तो फार काळ दूर राहाणार नाही. त्याचे अनुपस्थिती आमच्यासाठी मोठी आहे.'

Shikhar Dhawan | Sam Curran
IPL 2023: पंजाबच्या सेनापतीचा 'वन मॅन शो'! धवन @99 नॉटआऊट, 'या' खेळाडूंही केलाय असा अनोखा विक्रम

दरम्यान असे समजत आहे की 13 एप्रिलला गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या पंजाब किंग्सच्या सामन्यावेळी शिखरला खांद्याची दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला शनिवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले आहे. त्याच्या ऐवजी सॅम करन पंजाब किंग्सचे नेतृत्व करणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे सध्या शिखर धवन आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 4 सामन्यांमध्ये 2 अर्धशतकांसह 233 धावा केल्या आहेत.

दरम्यान, पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शनिवारच्या सामन्यासाठी अथर्व तायडे आणि हरप्रीत भाटीया यांना संधी मिळाली असून सिकंदर रझाचेही पुनरागमन झाले आहे. तसेच लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून युधवीर सिंग चरक याचे पदार्पण झाले आहे.

पंजाबने सॅम करन व्यतिरिक्त प्लेइंग इलेव्हनमध्ये मॅथ्यू शॉर्ट, सिकंदर रझा आणि कागिसो रबाडा या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे, तर लखनऊने काईल मेयर्स, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन आणि मार्क वूड या परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. त्यामुळे आता या दोन्ही संघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी ४ परदेशी खेळाडू असल्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून भारतीय खेळाडूंनाच खेळवता येणार आहे.

Shikhar Dhawan | Sam Curran
Shikhar Dhawan: गब्बरनं कोहलीला पछाडलं! ताबडतोड फिफ्टी ठोकत 'या' विक्रमाला घातली गवसणी

पंजाबने इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राखीव खेळाडूंमध्ये प्रभसिमरन सिंग, नॅथन एलिस, मोहित राठी आणि ऋषी धवन यांची निवड केली आहे. तसेच लखनऊने राखीव खेळाडूंमध्ये अमित मिश्रा, जयदेव उनाडकट, कृष्णप्पा गॉथम, प्रेरक मंकड आणि डॅनियल सॅम्स यांची निवड केली आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • पंजाब किंग्स - अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, सिकंदर रझा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, सॅम करन (कर्णधार), हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग

  • लखनऊ सुपर जायंट्स - केएल राहुल (कर्णधार), काईल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), आयुष बदोनी, आवेश खान, युधवीर सिंग चरक, मार्क वुड, रवी बिश्नोई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com