आयपीएल-15 येत्या 26 मार्च रोजी सुरू होणर आहे. यायबत बोलताना भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, आयपीएल-15 ही टीम इंडियाचा भावी कर्णधार शोधण्याची मोठी संधी आहे. (Ravi Shastri News)
रोहितनंतर कर्णधार कोण?
आयपीएलमध्ये सात वर्षांनंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल होणारे शास्त्री म्हणाले की, रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या आपले काम सर्वोत्तम पद्धतीने करत आहे. टीम इंडियाची कमान योग्य हातात आहे. याआधी विराट कोहलीने (Virat Kohli) देखील टीमचे उत्तम नेतृत्व केले होते. भारताचा भावी कर्णधार कोण असेल हे आता सांगणे थोडे कठीण आहे. मात्र श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि केएल राहुल हे मुख्य पर्याय आहेत आणि तिघेही यावेळी आयपीएलमध्ये आपापल्या संघांचे नेतृत्व करत आहेत. आयपीएल ही भावी कर्णधाराला पुढे आणण्याची मोठी संधी आहे.
वेगवान गोलंदाजांना सुवर्ण संधी
शास्त्री म्हणतात की, गेल्या आयपीएलमध्ये (IPL) व्यंकटेश अय्यरबद्दल कोणीही ऐकले नव्हते, पण स्पर्धा संपताच तो भारतीय संघात होता. यावर्षी खेळणाऱ्या गोलंदाजांसाठी ही मोठी संधी आहे. उत्तम कामगिरी केल्यास त्यांनाही भारतीय संघाचा भाग होण्याची संधी मिळेल.
हार्दिक पांड्या
हार्दिक पांड्या पहिल्यांदाच गुजरातचे कर्णधारपद भूषवणार आहे. याबबात बोलताना शास्त्री म्हणाले की, हार्दिक पांड्या हा उत्तम खेळाडू आहे. त्याला गुजरातचे नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे याचा मला आनंद आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.