IPL 2022: मुंबई इंडियन्सला मिळणार नवा कर्णधार?

आयपीएल 2022 (IPL 2022) पूर्वी विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्सचे कर्णधारपद सोडले.
Rohit Sharma
Rohit Sharma Dainik Gomantak

आयपीएल 2022 पूर्वी विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्सचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीनेही चेन्नई सुपर किंग्जची कमान रवींद्र जडेजाकडे सोपवली. आता रोहित शर्माही मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) कर्णधारपद सोडणार का? संजय मांजरेकर यांचेही असेच काहीसे मत समोर आले आहे. विराट कोहलीप्रमाणे रोहित शर्माही (Rohit Sharma) संघाचे कर्णधारपद सोडू शकतो, असं संजय मांजरेकर यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. एवढंच नाही तर संजय मांजरेकर यांनी मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधारही सुचवला. संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांच्या मतानुसार, रोहित शर्माने कर्णधारपद सोडले तर त्याच्या जागी कायरन पोलार्ड (Kieron Pollard) ही जबाबदारी पार पाडू शकतो. (Sanjay Manjrekar says if Rohit Sharma leaves the captaincy of Mumbai Indians Kieron Pollard can take over the responsibility)

Rohit Sharma
IPL 2022: रवींद्र जडेजा पुन्हा बनला RCB चा 'काळ', 3 विकेट्स घेत बनवला नवा रेकॉर्ड

दरम्यान, ESPN क्रिकइन्फोशी खास संवाद साधताना संजय मांजरेकर म्हणाले, ''मला वाटते की पोलार्डचे या संघात मोठे योगदान आहे. विराट कोहलीप्रमाणे रोहित शर्माही कर्णधारपद सोडू शकतो, असे मला वाटते. त्यामुळे रोहित शर्मावरील दडपण कमी होईल. तो एक फलंदाज म्हणून खेळू शकेल आणि त्याची जबाबदारी पोलार्डवर गेली पाहिजे, जो एक उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय कर्णधारही आहे.''

गेल्या 3-4 हंगामात रोहित शर्मा 'फ्लॉप'

तसेच, रोहित शर्मा 3-4 हंगामात म्हणावी तशी कामगिरी करु शकला नाही. या काळात रोहित शर्माच्या फलंदाजीची सरासरी 30 पेक्षा कमी आहे. संजय मांजरेकर पुढे म्हणाले, ''रोहित शर्मा जेव्हा भारताकडून खेळतो तेव्हा, त्याचे आकडे थक्क करायला लावणारे असतात. कारण तो स्वतःचा जास्त आणि संघाचा कमी विचार करतो. आयपीएलमध्ये खेळताना, तो अँकरची भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतो, जी केएल राहुल पंजाब किंग्जसाठी आणि हार्दिक पांड्या गुजरात टायटन्ससाठी करत आहे. रोहित शर्मा मोकळेपणाने खेळला तर भारताकडून खेळणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल.''

Rohit Sharma
IPL 2022: 'तू जाने ना...' बॉलिवूड गाण्यांमध्ये रमला निकोलस पूरन, पाहा व्हिडिओ

रोहित शर्मा गेल्या 5 सीझनमध्ये फ्लॉप!

चालू मोसमातील चारही सामन्यांमध्ये रोहित शर्मा फ्लॉप ठरला आहे. त्याने 20 च्या सरासरीने फक्त 80 धावा केल्या आहेत. दुर्देवाने त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. गेल्या पाच मोसमातही रोहित शर्मा फ्लॉप ठरला आहे. रोहित शर्मासारखा खेळाडू 30 पेक्षा कमी सरासरीने धावा करतो. 2019 मध्ये त्याने 400 हून अधिक धावा केल्या होत्या आणि तेव्हापासून रोहित शर्मा हा आकडा गाठू शकला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com