Gold-Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण; मात्र चांदीने घेतली मोठी झेप

आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट गोल्ड आज सकाळी 0.3 टक्क्यांनी घसरून $1,917.55 वर आणि सोन्याचे फ्युचर्स $1,920.30 नोंदवले गेले आहेत.
Gold-Silver Rate
Gold-Silver RateDainik Gomantak
Published on
Updated on

Gold-Silver Rate : डॉलर आणि ट्रेझरी उत्पन्नात वाढ झाल्यानंतर, या आठवड्यात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. युक्रेन आणि रशियामधील तणावामुळे मात्र सोन्याची मागणी मजबूत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट गोल्ड (Gold Rate) आज सकाळी 0.3 टक्क्यांनी घसरून $1,917.55 वर आणि सोन्याचे फ्युचर्स $1,920.30 नोंदवले गेले आहेत.

भारतीय बाजाराबद्दल बोलायचे झाले तर, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये रात्री 11.30 च्या सुमारास सोने 116 अंकांनी म्हणजेच 0.23% ने वाढून 51,228 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर होते. त्याचवेळी, चांदीचे दर (Silver Rate) 66,900 रुपये प्रति किलोच्या पातळीवर होते.

Gold-Silver Rate
Royal Enfield ची इलेक्ट्रिक बाइक लवकरचं भारतीय बाजारात

जर तुम्ही इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड म्हणजेच IBJA चा दर पाहिला, तर शेवटच्या अपडेटनुसार, सोन्या-चांदीची आजची किंमत अशी आहे- (या किमती GST शुल्काशिवाय प्रति ग्रॅम दिल्या आहेत)

999 (शुद्धता) - 51,638

995- 51,431

916 -47,300

750- 38,729

585- 30,208

चांदी 999- 66,889

शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोने 100 रुपयांनी वाढून 51,812 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. त्याच वेळी, चांदीचा भाव 252 रुपयांनी कमी होऊन 67,047 रुपये प्रति किलो झाले आहे. फ्युचर्स ट्रेडमध्ये सोन्याचा भाव 181 रुपयांनी घसरून 51,148 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com