आयपीएल 2022 मध्ये दोन नवीन संघ खेळताना दिसणार आहेत. त्यापैकी एक लखनौ आणि दुसरा अहमदाबाद संघ आहे. अहमदाबादने आपला संघ तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली असून भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा आयपीएल 2022 (IPL 2022) साठी या नवीन फ्रेंचायझीचे मुख्य प्रशिक्षक बनणार आहे. याशिवाय विक्रम सोळंकी हे या संघाचे क्रिकेट संचालक बनण्याच्या तयारीमध्ये आहेत. याशिवाय भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) माजी विश्वचषक विजेते प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) हे संघाचे मार्गदर्शक असतील. आशिष नेहरा (Ashish Nehra) यापूर्वी आरसीबीचा प्रशिक्षक होता.
दरम्यान, अहमदाबाद फ्रँचायझीने (Ahmedabad Franchise) अद्याप या नावांची अधिकृत घोषणा केलेली नाही. कारण लेटर आफ इंटेट मिळाल्यानंतरच ते केले जाऊ शकते. आशिष नेहरा संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील, तर सोलंकी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आणि क्रिकेट संचालक असतील, गॅरी संघाचे मार्गदर्शक असतील, असं सांगण्यात येत आहे. फ्रँचायझीच्या उच्च अधिकाऱ्यांनी त्यांची मुलाखत घेतली असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
शिवाय, आशिष नेहरा यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) प्रशिक्षक होता. तसेच गॅरीनेही या संघासाठी आपले योगदान दिले आहे. त्याचबरोबर आशिष नेहरालाही त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आहे, कारण गॅरी टीम इंडियाचे (Team India) प्रशिक्षक असताना आशिष भारतीय संघाकडून खेळत होता. आशिष नेहरा मागील दोन हंगामात कोणत्याही आयपीएल संघाशी संबंधित नव्हता. त्याला मागील काळात अनेक ऑफर्स येत होत्या, मात्र त्याने मुख्य प्रशिक्षक म्हणून मोठी जबाबदारी मिळाल्याने होकार दिला. आशिष नेहरा हा भारतीय संघातील सर्वोत्तम डावखुरा वेगवान गोलंदाज आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.