IPL 2021: हैदराबादला मोठा झटका, 'या' खेळाडूने आयपीएल सोडण्याचा घेतला निर्णय

सनरायझर्सचा दमदार फलंदाज शेरफान रदरफोर्डला (Sherfane Rutherford) स्पर्धा मधूनच सोडावी लागली असून त्याच्या वडिलांचे निधन झाले.
Sherfane Rutherford
Sherfane RutherfordTwitter/ @SunRisers
Published on
Updated on

सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) आयपीएल 2021 मध्ये मोठा धक्का बसला आहे. सनरायझर्सचा दमदार फलंदाज शेरफान रदरफोर्डला (Sherfane Rutherford) स्पर्धा मधूनच सोडावी लागली असून त्याच्या वडिलांचे निधन झाले. यामुळे शेरफान रदरफोर्डने सनरायझर्स हैदराबादला आयपीएल 2021 मध्ये सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते IPL 2021 चा बायो बबल सोडून घरी जात आहेत. शेरफान रदरफोर्ड एक वेस्ट इंडीज (West Indies) क्रिकेटपटू असून प्रथमच सनरायझर्स हैदराबाद संघात सामील झाला. त्याने जॉनी बेअरस्टोची (Johnny Bairstow) जागा घेतली होती. याआधी तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा (Mumbai Indians) भाग होता.

सनरायझर्स हैदराबादने सोशल मीडियाद्वारे रदरफोर्डच्या आयपीएलचं सत्र अर्धवट सोडण्याची माहिती दिली. टीमने म्हटले की, 'द सनरायझर्स हैदराबाद परिवाराकडून शेरफान रदरफोर्ड आणि त्याच्या कुटुंबाप्रती आमच्या संवेदना आहेत. शेरफानच्या वडिलांचे निधन झाले आहे. शेरफान या कठीण काळात आपल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी आयपीएल बायो बबल सोडेल. सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2021 च्या उत्तरार्धात एक सामना खेळला आहे. हा सामना 22 सप्टेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळला गेला. यामध्ये हैदराबादचा पराभव झाला होता. रदरफोर्डने या सामन्यात प्रदर्शन केले नव्हते.

Sherfane Rutherford
IPL 2021: दीपक हुड्डाने केले भ्रष्टाचारविरोधी तत्त्वांचे उल्लंघन? BCCI करणार तापसणी

रुदरफोर्ड आयपीएल 2019 मध्ये मुंबईकडून खेळला

आयपीएल 2019 मध्ये तो मुंबई संघाचा भाग होता. रदरफोर्ड आयपीएलमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण सात सामने खेळले असून 73 धावा केल्या आहेत. त्याने आयपीएल 2019 मध्येच सर्व सामने खेळले. यापूर्वी त्याला दिल्ली कॅपिटल्सने 2018 मध्ये विकत घेतले होते परंतु फायनल-11 मध्ये संधी मिळाली नव्हती. 2018 मध्येच त्याची वेस्ट इंडीज संघात निवड झाली. त्याने बांगलादेशविरुद्ध टी -20 मध्ये पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International cricket) आतापर्यंत एकूण सहा टी -20 सामने खेळले असून 43 धावा रुदरफोर्डने केल्या आहेत.

Sherfane Rutherford
IPL 2021: हिटमॅन रोहित आणि हार्दिक आजच्या सामन्यासाठी 'फिट' की 'अनफिट' ?

सनरायझर्स हैदराबाद आयपीएल 2021वाईट काळातून जात आहे. संघाने आठ पैकी फक्त एक सामना जिंकला आहे. संघातील अनेक खेळाडू अद्याप खेळण्यासाठी उपलब्ध नाहीत. जॉनी बेअरस्टो खेळण्यासाठी अद्याप उतरलेला नाही, अन्यथा टी नटराजनला कोरोना झाला असून त्याच्या संपर्कात आलेला विजय शंकर यास विलगीकरणकक्षात ठेवण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com