देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) वाढत असताना अनेक राज्यात लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला. सर्व आस्थापना बंद झाल्या तरी आयपीएल (IPL 2021) मात्र सुरु होती. अनेक लोकांनी टीका केल्यांनतर आयपीएलमधील खेळाडूंकडून मदतीचा ओघ सुरु झाला. कोरोना अवघ्या देशात थैमान घालत असताना आयपीएलचे खेळाडू त्यापासून कसे दूर राहतील. सुरवातीला अक्सर पटेल (Axar Patel), पडिक्काल हे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले. परंतू तरीही आयपीएल सुरु झाली. त्यानंतर कोरोनाने आयपीएल खेळाडूसाठी तयार केलेल्या बायो-बबलमध्ये प्रवेश केला. (The rest of the IPL matches and T20 World Cup in the UAE?)
कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) दोन खेळाडू पॉझिटिव्ह आल्यानंतर तो सामना पुढे ढकलण्यात आला. त्यांनतर अमित मिश्रा (Amit Mishra), वरून चक्रवर्ती (Varun Chakravarti), रिद्दीमान सहा, माईक हसी, बालाजी (Laxmipati Balaji), हे खेळाडू आणि कोच कोरोना पॉझिटिव्ह आले त्यानंतर बिसिसिआयने (BCCI) आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आयपीएलचे उर्वरित सामने कुठे होणार यावर आता प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात टी-20 (T-20 World Cup) चा वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उर्वरित आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कप बिसिसिआय युएईमध्ये (UAE) घेण्याचा आहे.
अगोदर आयपीएल की टी-20 वर्ल्ड कप?
आयपीएल 2021 चे उर्वरित 31 सामने सप्टेंबरपूर्वी आयोजित करणे भारतीय क्रिकेट बोर्डाला शक्य नाही. 14 सप्टेंबर रोजी इंग्लंडविरुद्ध (England Cricket) इंग्लंडमध्ये कसोटी मालिका संपल्यानंतर हा प्रयत्न केला जात आहे. इंग्लंडमधील बायो बबलमध्ये भारत आणि इंग्लंडचे खेळाडू असणार असल्याने युएईमध्ये नवीन बायो बबलमध्ये सामील होणे त्यांना कठीण होणार नाही. अशा परिस्थितीत 25 सप्टेंबरपासून ते ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या जवळपास आयपीएल आयोजित करण्याचा भारतीय बोर्ड प्रयत्न करीत आहे.
वर्ल्ड कपसाठी सर्व संघ येतील
जर वर्ल्ड कप भारताऐवजी युएई मध्ये झाला तर येत्या काही दिवसात याची घोषणा होऊ शकते. अशा परिस्थितीत जगभरातील सर्व संघांचे खेळाडू ऑक्टोबरमध्ये युएईमध्ये येणार आहेत. लीग खेळल्यानंतर लगेच सर्व खेळाडू विश्वचषकात ते त्यांच्या राष्ट्रीय संघात सहभागी होऊ शकतील म्हणून भारतीय संघ आयपीएलशी संबंधित परदेशी खेळाडूंना आधीपासूनच युएईला बोलाविण्याचा प्रयत्न करेल. तसेच, जे खेळाडू विश्वचषकात भाग घेत नाहीत त्यांना आपापल्या देशात परत पाठवण्याचा प्रयत्न करेल.
तिसरी लाट येण्याची शक्यता
नोव्हेंबरच्या सुमारास देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने भारतामध्ये विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याची शक्यता कमी आहे. तसेच, देशात बायो बबलचा वापर यशस्वी झाला नाही. परदेशी खेळाडू भारतात यायला नकार देत आहेत. 2020 मध्ये झालेल्या युएई आयपीएलमध्ये बायो बबलचा पर्याय यशस्वी ठरला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.