कर्णधार विराट कोहलीच्या (Captain Virat Kohli) नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघ इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या (14th IPL season) हंगामात शेवटचा खेळताना दिसला, कारण यूएई मध्ये सुरु असलेल्या IPL 2021च्या दुसऱ्या सत्रात बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर करून सर्वांना धक्का दिला. प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवल्यानंतर एलिमिनेटर मध्ये कोलकत्ता (KKR) विरुद्ध कर्णधार कोहलीच्या बेंगलोर संघाला पराभव पत्करावा लागल्याने बेंगलोर संघ स्पर्धेतून बाहेर झाला.
कर्णधार म्हणून आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे विराटचे स्वप्न अपूर्ण राहिले, असेच म्हणावे लागेल. या यादीमध्ये अजूनही खेळाडू आहेत ज्यांची कारकीर्द कर्णधार म्हणून निराशेत गेली. ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड अश्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होतो. या खेळाडूंना देखील कर्णधार म्हणून आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही.
निराश होऊन घेतला निर्णय...
विराट कोहलीचे नाव या यादीत सर्वात वर येईल कारण त्याला अनेक वर्षे आरसीबीचे कर्णधार राहण्याची संधी मिळाली होती. फ्रँचायझी संघाने बराच काळ त्यांच्यावर विश्वासही ठेवला, मात्र तो एक खेळाडू म्हणून यशस्वी झाला पण तो संघाला कधीच आय पी एल ची ट्रॉफी जिंकून देऊ शकला नाही. एकूण 140 सामन्यांचे कर्णधारपद सांभाळल्यानंतरही विराटची कर्णधारपदाची कारकीर्द निराशेने संपली.
या यादीत अनुभवी खेळाडू वीरेंद्र सेहवागचे नाव दुसऱ्या क्रमांकावर येते. दिल्लीकडून खेळताना सेहवागने 52 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले पण संघाला ट्रॉफी मिळवून देण्यात अपयशी ठरला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा क्रमांक लागतो. तेंडुलकरने 51 सामन्यांत मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळले पण एकही आयपीएल ट्रॉफी जिंकू शकला नाही.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या राहुल द्रविडचे आयपीएल कर्णधारपदही ट्रॉफीशिवाय गेले. त्याने एकूण 48 सामन्यांमध्ये (34 राजस्थान रॉयल्स आणि 14 रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) कर्णधारपद भूषवले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.