पाकिस्तानचे पंतप्रधान (Pakistan Prime Minister) इम्रान खान (Imran Khan) हे नेमहीच आपल्या वक्त्यव्याबद्दल चर्चेत असतात. यावेळीही त्यांनी BCCI बदल एक विधान केलं आहे त्यांनी कबूल केले आहे की भारत (India) संपूर्ण जगाचे क्रिकेट नियंत्रित करतो.1992 मध्ये आपल्या कर्णधारपदाखाली पाकिस्तानला विश्वविजेता बनवणाऱ्या आणि सध्या पाकिस्तनचे पंतप्रधान असणाऱ्या इम्रान खान यांनी रमीज राजा (Rameez Raja) यांच्या वक्तव्याचे देखील समर्थन केले आहे ज्यात रमीज राजांनी भारताला हवे असल्यास पाकिस्तान गरीब होऊ शकतो असे विधान केले होते. (BCCI is a richest cricket control board says Pakistan Prime Minister Imran Khan)
यावरच बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, बीसीसीआय हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. तो जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवतो. इंग्लंडने नुकताच आमचा दौरा रद्द केला होता, पण भारताविरुद्ध असे करण्याचे धाडस कोणाकडेही नाही.त्याचबरोबर त्यांनी सध्याच्या जगात पैसाच महत्वाचा तेच असे सांगत भारत सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे . अशा परिस्थितीत कोणताही देश भरताविरोधात पाऊल उचलण्याचे धाडस करणार नाही.तसेच केवळ खेळाडूच नाही तर विविध देशांच्या मंडळांनाही भारताकडून पैसे मिळतात. यामुळे तो क्रिकेटवर पूर्णपणे नियंत्रण ठेवत आहे.असे सांगत त्यांनी एका नवीन वादाला तोंड फोडलं आहे.
अलीकडेच, पीसीबीचे अध्यक्ष रमीज राजा यांनीही म्हटले होते की, बीसीसीआयने आयसीसीला निधी देणे बंद केल्यास पाकिस्तान उद्ध्वस्त होईल.त्याचबरोबर पाकिस्तानचे क्रिकेट मंडळ आयसीसीच्या निधीतून पन्नास टक्के चालवते. त्याचबरोबर आयसीसीला 90 टक्के निधी भारताकडून येतो.असेही विधान त्यांनी केले होते.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंड क्रिकेट संघ 11 सप्टेंबर रोजी तीन एकदिवसीय आणि पाच टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानला पोहोचला होता . मात्र 17 सप्टेंबर रोजी सुरक्षेच्या धोक्याचे कारण देत पहिला एकदिवसीय सामना होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच त्यांचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे PCB ला मोठा धक्का बसला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.