चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) नंतर आता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) देखील दुबईल (Dubai) वारीसाठी तयार आहे, मात्र सरकारकडून लॅंडींगची परवानगी मिळालेली नाही. चेन्नई सुपर किंग्ज सोबत गतविजेता मुंबई इंडियन्स संघ देखील शुक्रवारी आयपीएल 2021 साठी दुबईला जाणार आहे. 19 सप्टेंबर रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL-14) 14 व्या हंगामासाठी यूएई (UAE) लीगच्या पहिल्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. मात्र दुबईकडून लॅंडींगची परवानगी न मिळाल्याने हे संघ वाट पाहत आहे.
मुंबई इंडियन्स संघाला बायो बबल मधुन दुबईतील बायो बबलमध्ये शीफ्ट केले जाणार आहे. तसेच खेळाडूंना यूएईमध्ये (UAE) पोहोचल्यानंतर विलगीकरणाचा कालावधीसुद्धा पुर्ण करावा लागणार आहे. मुंबई इंडियन्स संघात असलेले भारतीय खेळाडू मुंबईत बायो बबलमध्ये सराव करता आहेत. मिळालेल्या माहितीनुसार खेळाडू गेल्या 2 आठवड्यांपासून मुंबईच्या घणसोली येथील रिलायन्स कॉर्पोरेट पार्कमध्ये सराव करता आहेत. क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केल्यानंतर सर्व खेळाडू संघासोबत एकत्र येतील.
मुंबईतील बायो बबलमध्ये उपस्थित असलेल्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची सातत्याने कोरोना चाचणी केली जाते आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स व्यवस्थापनाने जे हॉटेल गेल्या मोसमात बुक केलेले होते त्याच हॉटेलचे बुकिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर 6 संघांचे सदस्य या हंगामात नवीन हॉटेलमध्ये राहतील.
चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी सांगितले की, शुक्रवारी दुबईला जाण्याचा विचार करत होतो, परंतु अद्यापही यूएई (UAE) सरकारच्या मान्यतेची वाट पाहत आहोत. त्यामुळे आता दुबईकडून परवानगी मिळाल्यानंतरच भारतातुन निघता येणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.