भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पूर्व भारतीय क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला) यांच्या पेन्शनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी माजी क्रिकेटपटूंच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. याचा फायदा जवळपास 900 पुरुष आणि महिला क्रिकेटपटूसंह सामना अधिकाऱ्यांना होणार आहे. बीसीसीआय सचिव शहा म्हणाले की, लवकरच क्रिकेटपटूसंह सामना अधिकाऱ्यांना याचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. (bcci secretary jay shah announces increase in the monthly pension of former cricketers and match officials)
बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी ट्विट करत म्हटले की, 'माजी क्रिकेटपटू आणि सामना अधिकाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ झाल्याची घोषणा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. सुमारे 900 क्रिकेटपटूंना याचा लाभ होणार आहे. ज्यांना पेन्शन मिळत आहे, त्यापैकी सुमारे 75 टक्के कर्मचाऱ्यांना 100 टक्के पेन्शन वाढीचा लाभ घेता येणार आहे.'
तसेच, ज्या खेळाडूंना निवृत्ती वेतन म्हणून 15 हजार रुपये मिळत होते, त्यांना आता 30 हजार रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर 22 हजार 500 रुपये पेन्शन मिळालेल्या माजी क्रिकेटपटूंना मासिक 45 हजार रुपये मिळणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक श्रेणीतील खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.