Tajinderpal Singh Toor Shot Put: तीन दिवसांपूर्वी आजीला गमावलं, पण दु:ख पचवून तेजिंदरपालने रचला नवा एशियन रेकॉर्ड

भारताचा गोळाफेकपटू तेजिंदरपालने सोमवारी विक्रमी गोळा फेक करत नवा एशियन रेकॉर्ड रचला आहे.
Tajinderpal Singh Toor
Tajinderpal Singh ToorDainik Gomantak
Published on
Updated on

Tajinderpal Singh Toor break own Asian Shot Put record: भारताचा अव्वल क्रमांकाचा गोळा फेकपटू तेजिंदरपाल सिंग तूरने सोमवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. त्याने भुवनेश्वरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय अंतर-राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने अखेरच्या दिवशी गोळा फेकीचे विक्रमी अंतर पूर्ण केले.

पंजाबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तेजिंदरने तिसऱ्या प्रयत्नात 21.77 मीटर दूर गोळा फेकत त्याचाच राष्ट्रीय आणि आशियाई विक्रम मोडला. यासह तो वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठीही पात्र ठरला आहे.

त्याने त्याचा 2021 मध्ये केलेला 21.49 मीटर गोळा फेकीचा आशियाई विक्रम मागे टाकला आहे. त्याने हा विक्रम 2021 मध्ये पटियालामध्येकेला होता. दरम्यान, कलिंगा स्टेडियममध्ये झालेल्या राष्ट्रीय अंतर-राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने 21.77 मीटर गोळा फेकण्याची जी कामगिरी नोंदवली, ते जागतिक स्तरावरील नववे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन ठरले.

Tajinderpal Singh Toor
India Football Team: छेत्रीच्या टीम इंडियाला मिळणार 'एवढ्या' कोटीचे बक्षीस, ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी पात्र ठरण्याचे मानक 21.40 मीटर आहे. त्यामुळे तो या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तसेच तो यावर्षी होणाऱ्या एशियन गेम्ससाठीही पात्र ठरला आहे, ज्याच्या पात्रतेचे मानक 19 मीटर आहे.

पंजाबचाच करणवीर सिंग या स्पर्धेत 19.78 मीटर गोळा फेक करत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यानेही एशियन गेम्ससाठी पात्रता मिळवली आहे.

तीन दिवसांपूर्वी आजीला गमावले

दरम्यान, तेजिंदरसाठी ही स्पर्धा खेळणे सोपे नव्हते, कारण त्याने तीन दिवसांपूर्वीच त्याच्या आजीला गमावले होते.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार त्याने स्पर्धेनंतर सांगितले की 'जेव्हा मला कळाले की मी विक्रम मोडला आहे, तेव्हा मी थोडा भावूक झालो. माझ्या डोळे ओलावले होते आणि मी काही क्षण आजीबद्दल विचार करत होतो. मला हे पदक (सुवर्णपदक) तिलाच समर्पित करायचे आहे.'

Tajinderpal Singh Toor
Bhavani Devi Fencing: भवानी देवीनं चीनमध्ये रचला इतिहास! 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच भारतीय तलवारबाज

तेजिंदरसाठी त्याची आजी त्याच्यासाठी मोठा पाठिंबा होती. तिने त्याला अनेकदा खेळासाठी प्रोत्साहन देताना मदत केली आहे.

एशियन गेम्समधून पदकाची अपेक्षा

यावर्षी हँगझोऊमध्ये होणाऱ्या एशियन गेम्समध्ये पदक मिळवण्यासाठी तेजिंदर प्रबळ दावेदार आहे. दरम्यान, त्याच्यासाठी गेली दोन वर्षे कठीण होती. त्याला मनगटाला झालेल्या दुखापतीनंतर टोकियो ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहचण्यात अपयश आले होते.

त्याची नंतर शस्त्रक्रियाही झाली, ज्यामुळे त्याला काहीकाळ मैदानापासून दूर रहावे लागले. पण आता त्याचे पुनरागमन झाले असून आता त्याच्याकडून पदकांचीही अपेक्षा केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com