IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने शानदार शतक झळकावले. गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर ऋतुराज गायकवाडने 52 चेंडूंचा सामना करत शानदार शतक झळकावले. यादरम्यान ऋतुराज गायकवाडने 13 चौकार आणि 7 गगनचुंबी षटकार लगावले. टीम इंडियाने 24 धावांवर 2 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने आधी सूर्यकुमार यादव आणि नंतर तिलक वर्मासोबत शानदार भागीदारी करत टीम इंडियाची धावसंख्या 200 धावांच्या पुढे नेली. ऋतुराज गायकवाडने 57 चेंडूत 123 धावांची खेळी केली.
दरम्यान, ऋतुराज गायकवाडच्या या शानदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 3 गडी गमावून 222 धावा केल्या. म्हणजेच आता हे लक्ष्य गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 223 धावा कराव्या लागतील. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली पण भारतीय डावाच्या दुसऱ्याच षटकात 14 धावांवर सलामीवीर यशस्वी जयस्वाल विकेट पडली. यानंतर ईशान किशनही तिसऱ्या षटकात रिचर्डसनचा बळी ठरला. येथून ऋतुराज गायकवाडने सूर्यकुमार यादवसोबत शानदार भागीदारी केली. ऋतुराज गायकवाडने आपल्या शानदार खेळीत 7 गगनचुंबी षटकार ठोकले आणि 123 धावांची दमदार खेळी केली.
याआधी, टीम इंडियाने दोन्ही टी-20 सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याआधीही ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या याच T20 मालिकेत शानदार अर्धशतक झळकावले होते. ऋतुराज गायकवाडशिवाय कर्णधार सूर्यकुमार यादवनेही 29 चेंडूंत 5 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 39 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय, तिलक वर्मानेही 24 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने महत्त्वपूर्ण 31 धावा केल्या.
126* - शुभमन गिल
123* - ऋतुराज गायकवाड
122* -विराट कोहली
118 - रोहित शर्मा
117* - सूर्यकुमार यादव
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.