IND vs AUS: ऑस्ट्रेलिया संघातून 6 खेळाडू बाहेर! तिसऱ्या T20 मॅचच्या काही तासांपूर्वीच मोठा निर्णय

India vs Australia T20I: भारताविरुद्ध सुरु असलेल्या टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यापूर्वी तब्बल 6 खेळाडू संघातून बाहेर झाल्याची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली आहे.
Australia Team
Australia TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Six Players of Australia's ICC Cricket World Cup squad rested for remainder of five-match T20I series against India:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या 5 सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने खेळून झाले आहेत. आता तिसरा सामना गुवाहाटीला मंगळवारी (28 नोव्हेंबर) होणार आहे. पण या सामन्याला सुरुवात होण्याच्या काही तास आधीच ऑस्ट्रेलियाने त्यांच्या संघात अनेक बदल केले आहेत.

या टी२० मालिकेआधी झालेली वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. त्यानंतर या स्पर्धेत खेळलेल्या काही खेळाडूंना ऑस्ट्रेलियाने टी20 मालिकेतून विश्रांती दिली होती, तर काही खेळाडू संघात कायम होते.

स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, ऍडम झम्पा असे खेळाडू भारताविरुद्ध टी20 सामन्यांमध्ये खेळतानाही दिसले. पण आता वर्ल्डकप 2023 मध्ये खेळलेल्या 6 खेळाडूंना ऑस्ट्रेलियाने उर्वरित टी20 मालिकेतून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

Australia Team
World Cup 2023: प्रेक्षकांनी रचला इतिहास! तब्बल 'इतक्या' कोटी लोकांनी पाहिली फायनल, जय शाह यांची माहिती

त्यामुळे गुवाटीमध्ये तिसरा टी20 सामना झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, जोश इंग्लिस आणि सीन ऍबॉट ऑस्ट्रेलियाला परतणार आहेत. तसेच स्टीव्ह स्मिथ आणि ऍडम झम्पा हे दोन खेळाडू यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला परतले आहेत. या खेळांडूंचे वर्ल्डलोड सांभाळण्याच्या दृष्टीकोणातून त्यांना उर्वरित टी20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.

त्यामुळे आता वनडे वर्ल्डकप खेळलेला फक्त ट्रेविस हेड भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतात थांबणार आहे. हेड वर्ल्डकपमधील पहिल्या टप्प्यातील सामन्यांना दुखापतीमुळे मुकला होता. पण नंतर त्याने संघात परत येत त्याचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. तो उपांत्य आणि अंतिम सामन्यातील सामनावीरही ठरला.

Australia Team
IND vs AUS: विजयाच्या 'हॅट्रिक' साठी सूर्या ब्रिगेड सज्ज! जाणून घ्या गुवाहाटी मैदानावरील रेकॉर्ड

दरम्यान, उर्वरित टी20 मालिकेतून विश्रांती देण्यात आलेल्या खेळाडूंच्या जागेवर ऑस्ट्रेलिया संघात बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, बेन ड्वारशुई आणि ख्रिस ग्रीन यांना संधी देण्यात आली आहे.

तथापि, या टी20 मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत 2-0 अशा आघाडीवर असून आता उर्वरित मालिकेतील एकही सामना जिंकल्यात भारत मालिकाही खिशात घालू शकतो.

ऑस्ट्रेलियाचा बदललेला संघ - मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेऱ्हेनडॉर्फ, टीम डेव्हिड, बेन ड्वारशुई, नॅथम एलिस, ख्रिस ग्रिन, ऍरॉन हार्डी, ट्रेविस हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, केन रिचर्डसन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com