Dutee Chand: स्टार भारतीय धावपटूवर मोठे संकट! डोप टेस्ट पॉझिटिव्ह येताच निलंबनाची कारवाई

द्युती चंद डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळली आहे.
Dutee Chand
Dutee ChandDainik Gomantak
Published on
Updated on

Dutee Chand: भारतीय धावपटू द्यूती चंदला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. द्यूती डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे तिच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत बुधवारी माहिती सष्ट झाली.

नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीकडून (NADA) जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात माहिती देण्यात आली आहे की द्युतीच्या युरीन सँपलमध्ये अँडरिन (andarine), ओस्टारिन (ostarine) आणि लिगान्ड्रोल (ligandrol) हे पदार्थ आढळले आहेत.

या पदार्थांचा खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी दुरपयोग केला जातो. त्यामुळे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीच्या (WADA) प्रतिबंधित पदार्थांच्या यादीत त्यांचा समावेश आहे.

Dutee Chand
अँटी डोपिंग चाचणीत दोषी अढळल्याने सुमित मलिकचे निलंबन

दरम्यान, 26 वर्षीय द्युतीला बी सँपलच्या तपासणी करण्याची मागणी करण्याचा अधिकार आहे. द्युतीचे 5 डिसेंबर 2022 रोजी भुवनेश्वरमध्ये युरिन सँपल घेण्यात आले होते. तिच्या सँपलमध्ये आढळलेले तीन पदार्थ हाडांची आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी वापरले जातात.

द्यूती चंदला नाडाने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की 'आम्ही तुम्हाला सूचिक करू इच्छितो की तुमच्या सँपल ए ची तपासणी झाली होती, जी वाडाच्या नियमांनुसार पॉझिटिव्ह आली आहे.' याबरोबरच पत्रात पुढील परिणाम काय होऊ शकतात याची कल्पनाही देण्यात आली आहे.

आता या बंदीमुळे तिच्या आगामी एशियन गेम्समधील सहभागावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

(Dutee Chand failed in dope test)

Dutee Chand
Neeraj Chopra: नवीन वर्षात गोल्डन बॉयसमोर असणार 'हे' लक्ष्य

द्युती चंदच्या नावावर सध्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम आहे. तसेच धनलक्ष्मी शेखर, हिमा दास आणि अर्चना सुसिंद्रन यांच्यासह तिच्या नावावर 100 मीटर रिले शर्यतीचाही राष्ट्रीय विक्रम आहे.

26 वर्षीय द्युती चंदने 2018 साली जकार्ताला झालेल्या एशियन गेम्समध्ये 100 मीटर आणि 200 मीटर शर्यतीत रौप्य पदकाची कमाई केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com