Suryakumar Yadav: 'सूर्याची सॅमसनबरोबर तुलना नकोच, जर तो...', टीकाकारांना कपिल देव यांच चोख उत्तर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तीनदा गोल्डन डक झाल्यानंतर सुर्यकुमार यादववर टीका होत आहे, पण आता कपिल देव यांनी त्याच्या टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
Kapil Dev Suryakumar Yadav
Kapil Dev Suryakumar YadavDainik Gomantak

Kapil Dev Support Suryakumar Yadav: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तीन सामन्यांची वनडे मालिका नुकतीच बुधवारी संपली. या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाने 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. ही मालिका भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी विसरण्यासारखी राहिली. सूर्यकुमार या मालिकेत सपशेल अपयशी ठरला, असे असतानाही माजी कर्णधार कपिल देव यांनी त्याला पाठिंबा दिला आहे.

सूर्यकुमार यादवला या संपूर्ण मालिकेत एकही चेंडू खेळता आला नाही. तो या मालिकेतील मुंबई आणि विशाखापट्टणमला झालेल्या वनडे सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना मिचेल स्टार्कविरुद्ध त्याचा पहिलाच चेंडू खेळताना पायचीत बाद झाला.

Kapil Dev Suryakumar Yadav
Suryakumar Yadav: टी20 मधील 'मिस्टर 360' वनडेत फ्लॉप! सूर्याचं चूकतंय कुठे? जाणून घ्या 4 महत्त्वाचे मुद्दे

त्यानंतर चेन्नईला झालेल्या अखेरच्या वनडे सामन्यात तो सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. पण तरी त्याचा फायदा झाला नाही. तो ऍश्टन एगारविरुद्ध पहिलाच चेंडू खेळताना त्रिफळाचीत झाला. त्यामुळे सूर्यकुमारवर सलग तीन वनडे सामन्यांमध्ये गोल्डन डक होण्याची नामुष्की ओढावली.

यानंतर आता त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असून त्याच्या ऐवजी संजू सॅमसनला संधी द्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी दिली. आता याबद्दल कपिल देव यांनी भाष्य केले आहे.

कपिल देव यांनी म्हटले आहे की सूर्यकुमारची तुलना संजू सॅमसनबरोबर होणे चुकीचे आहे. एबीपी न्यूजच्या एका कार्यक्रमात कपिल देव म्हणाले, 'जो क्रिकेटपटू चांगला खेळला आहे, त्याला नेहमीच जास्त संधी दिली जाते. सूर्याची संजू सॅमसनबरोबर तुलना करू नका. ते बरोबर वाटत नाही. जर संजू वाईट फॉर्ममधून जात असेल, तर तुम्ही दुसऱ्या खेळाडूबद्दल चर्चा करणार का?'

'असे होणे चूकीचे आहे. जर संघ व्यवस्थापनाने सूर्यकुमारला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे, तर त्याला आणखी संधी मिळणार. नक्कीच लोक बोलणार आणि त्यांची मतंही मांडणार, पण अखेरीस अंतिम निर्णय व्यवस्थापनाचाच असणार आहे.'

Kapil Dev Suryakumar Yadav
फक्त Suryakumar Yadav नाही, 'हे' खेळाडूही झालेत सलग तीनदा 'गोल्डन डक'

त्याचबरोबर तिसऱ्या वनडेत सूर्याच्या बदललेल्या फलंदाजी क्रमांकाबद्दलही कपिल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'सामना संपल्यानंतर बोलणे खूप सोपे असते. कदाचीत सूर्यकुमारला 7 व्या क्रमांकावर पाठवण्यामागे त्याला फिनिशर म्हणून संधी देण्याचा हेतू असेल. फलंदाजी क्रम बदलणे वनडेत नवीन नाही असे यापूर्वीही अनेकदा झाले आहे.'

'असे होते की जर फलंदाजाला खाली फलंदाजीला पाठवले, तर त्याच्या आत्मविश्वासाला तडा जातो. पण अशावेळी त्या खेळाडूची जबाबदारी असते की त्याने कर्णधाराला सांगावे की मी वरच्या फळीत स्वत:ला सांभाळू शकतो. कर्णधार आणि प्रशिक्षकाने याबद्दल विशिष्ट विचार करून निर्णय घेतलेला असावा.'

सूर्यकुमारने आत्तापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 23 सामने खेळले असून त्याने 24.05 च्या सरासरीने 2 अर्धशतकांसह 433 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com