Pranali Kodre
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नुकतील वनडे मालिका पार पडली.
या वनडे मालिकेत भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने नकोसा विक्रम केला आहे.
तो या वनडे मालिकेतील सर्व तिन्ही सामन्यांत त्याचा पहिलाच चेंडू खेळताना शुन्यावर बाद झाला.
त्यामुळे तो भारताचा पहिला फलंदाज बनला आहे, जो वनडेत सलग तीनवेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे.
सूर्यकुमारला या मालिकेत मुंबई आणि विशाखापट्टणम येथे झालेल्या वनडे सामन्यांमध्ये मिचेल स्टार्कने शुन्यावर पायचीत केले, तसेच चेन्नईत झालेल्या अखेरच्या वनडेत ऍश्टन एगारने त्रिफळाचीत केले.
दरम्यान, सूर्यकुमारप्रमाणे गोल्डन डक नाही, पण वनडेत सलग तीनवेळा सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, झहीर खान, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे भारतीय खेळाडू देखील शुन्यावर बाद झाले आहेत.
तसेच सलग तीनवेळा गोल्डन डक होणारा सूर्यकुमार जगातील एकूण 14 वा फलंदाज आहे.
सलग तीनवेळा गोल्डन डक होणाऱ्या फलंदाजांमध्ये सूर्यकुमार व्यतिरिक्त ऍलेक स्टीवर्ट, अँड्र्यू सायमंड्स, शेन वॉटसन, टोनी ब्लेन, इयान ब्लॅकवेल, निकोलस ग ग्रुट, वुसी सिबांडा, तिनाशे पान्यांगरा, ब्रेट ली, जेम्स एनगोशे, देवेंद्र बिशू, ऍलेक्स कुसॅक आणि ब्लेसिंग मुझराबनी यांचा समावेश आहे.