Ind vs Aus 2nd ODI, Playing XI: दुसऱ्या वनडेत अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन, सिराज करणार पुनरागमन

Ind vs Aus: टीम इंडिया इंदूरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करु शकते. आशिया कपच्या फायनलमधील हिरो मोहम्मद सिराज पुनरागमन करु शकतो.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Australia 2nd ODI: मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतल्यानंतर टीम इंडिया इंदूरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करु शकते. आशिया कपच्या फायनलमधील हिरो मोहम्मद सिराज पुनरागमन करु शकतो.

दरम्यान, पहिल्या एकदिवसीय सामन्यात सिराजला विश्रांती देण्यात आली होती, जिथे मोहम्मद शमीने शानदार पाच बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशा स्थितीत शमीला वगळले जाणार नाही, म्हणजेच सिराजच्या पुनरागमनासाठी अष्टपैलू शार्दुल ठाकूरला वगळले जाऊ शकते.

Team India
IND vs AUS: इंदूरमध्ये दोन्ही संघांसाठी 'आश्चर्यकारक' योगायोग, होळकर स्टेडियम टीम इंडियासाठी लकी!

दुसरीकडे, विराट कोहली, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना सिराजला संधी द्यायला नक्कीच आवडेल. आशिया कप फायनलमध्ये विक्रमी कामगिरी करणारा सिराज भारताच्या तीन वेगवान गोलंदाजांच्या सेटअपमध्ये परतणार आहे. गेल्या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीनंतर शमी कायम राहणार आहे. शार्दुल ठाकूरला पहिल्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही, तर त्याची गोलंदाजी विशेष नव्हती, जिथे त्याने 10 षटकात 78 धावा दिल्या.

दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता थोडाच अवधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत भारत आपले तीन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, सिराज आणि शमी यांना सरावासाठी आणखी संधी देऊ शकतो. मात्र, फलंदाजीच्या क्रमात कोणताही महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित नाही.

Team India
IND vs AUS: सरावाला सुट्टी नाही! पहिली वनडे जिंकताच अश्विनची रात्री बॅटिंग प्रॅक्टिस, पाहा Video

भारताची प्लेइंग इलेव्हन:

शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com