फातोर्डा: स्क्वेय असोसिएशन ऑफ कर्नाटकने (Squay Association of Karnataka) स्क्वेय फेडरेशन ऑफ इंडियाच्या (Squay Federation of India) सहकार्याने आयोजित केलेल्या दुसऱ्या ऑनलाईन स्क्वेय आर्टिस्टिक राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत गोव्याला (Goa) दुसरे स्थान प्राप्त झाले. गोव्याला 4 सुवर्ण, 2 रौप्य, 9 कांस्य पदकांसह एकुण 15 पदके मिळाली. गोव्याचे 35 गुण झाले. प्रथम स्थान अंदमान निकोबारला (Andaman Nicobar) प्राप्त झाले. त्यांना 5 सुवर्ण, 4 रौप्य व 5 कांस्य पदकांसह एकुण 14 पदके मिळाली. पण त्यांना एक सुवर्ण पदक जास्त मिळल्या मुळे त्यांचे 42 गुण झाले.
ही स्पर्धा 11, 14 व 18 वर्षाखालील अशा तीन वयोगटांमध्ये झाली. या स्पर्धेत एकुण 19 राज्यातील खेळाडुंनी भाग घेतला व जम्मू काश्मिर 27, महाराष्ट्र 26 व कर्नाटक 25 पदकें यांना पहिल्या पाच क्रमांकांमध्ये स्थान मिळाले.
गोव्यासाठी प्रज्वल ए पवार (Prajwal A. Pawar) (11 वर्षाखालील), स्वेता आर पंडित, सक्षम एस कुंकळयेकर, समिक्षा सी भट (14 वर्षाखालील) यांना सुवर्ण पदके प्राप्त झाली. यश आर. नाईक (11 वर्षाखालील) श्रेश सोलियेकर देसाई (18 वर्षाखालील) यांना रौप्य पदक जिंकता आले. सांची जी प्रभु नास्नोडकर, सानवी एस नाईक, दक्ष डी नाईक, कशीश जी नाईक (11 वर्षाखालील), आर्यन ए नाईक, सिमरन ए पवार (14 वर्षाखालील), दिप्तेश डी नाईक, आलबर्ट एफ फेर्रांव, लकेशा झोयसा फर्नांडिस( 18 वर्षाखालील) यांनी कांस्य पदके जिंकली. या स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, ओडिशा, दिल्ली, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार यांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.