India Football: सर्वोत्तम रेफरी पुरस्काराने प्रेरणा : तेजस

India Football: 2020-21 मधील देशातील सर्वोत्तम फुटबॉल रेफरी पुरस्कारासाठी निवड
India Football: Tejas Nagvenkar
India Football: Tejas NagvenkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : भारतीय फुटबॉलमध्ये (India Football) सर्वोत्तम फुटबॉल रेफरी बनणे प्रेरणादायी आहे. त्यामुळे अव्वल दर्जा राखण्यासाठी आवश्यक त्याग करण्यासाठी प्रेरित बनल्याचे मत गोमंतकीय फुटबॉल पंच तेजस नागवेकर (Tajas Nagvenkar) यांनी व्यक्त केले आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (All India Football Federation)2020-21 मधील देशातील सर्वोत्तम फुटबॉल रेफरी पुरस्कारासाठी 35 वर्षीय तेजस यांची निवड केली आहे. गतमोसमात त्यांनी इंडियन सुपर लीग (Indian Super League) स्पर्धेच्या अंतिम लढतीत रेफरीची भूमिका पार पाडली. अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय फुटबॉल पंच ठरले. या वर्षी 13 मार्च रोजी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या मुंबई सिटी व एटीके मोहन बागान यांच्याती अंतिम लढतीत तेजस मुख्य रेफरी होते. ``हा पुरस्कार माझ्यासाठी फार मोलाचा आहे. अव्वल दर्जा राखण्यासाठी आवश्यक असलेला त्याग साधण्यासाठी त्यामुळे मला प्रेरणा मिळाली आहे, तसेच मागील बऱ्याच वर्षांतील माझ्या मेहनतीवरही शिक्कामोर्तब झाले आहे. हा पुरस्कार मी कुटुंबीय, मार्गदर्शक, शुभचिंतक यांना अर्पित करत असून संधी दिल्याबद्दल महासंघाचाही आभारी आहे,`` असे तेजस यांनी एआयएफएफ संकेतस्थळास सांगितले.

India Football: Tejas Nagvenkar
Goa: धेंपो क्लब अकादमी प्रशिक्षणार्थींचे शैक्षणिक यश

खेळाडूंचे मानसशास्त्र समजणे महत्त्वाचे

फुटबॉल सामन्याच्या वेळेस मैदानावर खेळाडूंची मानसशास्त्र समजून घेणे महत्त्वाचे ठरले, तेव्हाच रेफरी चांगली कामगिरी बजावू शकतो, असे तेजस यांनी नमूद केले. सामन्यात खेळाडूंना काय हवे आहे हे समजून खूप महत्त्वाचे असते. रेफरी या नात्याने मी खेळाडूंचे मानसशास्त्र जाणून घेतले, तर सामना हाताळणे सोपे बनले, असे तेजस म्हणाले.

सतरा वर्षांची कारकीर्द

वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी तेजस यांनी काक गोकुळदास व जयेंद्र यांच्या साथीने राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धांत पंचगिरी करण्यास सुरवात केली. तब्बल 17 वर्षांच्या मेहनतीनंतर ते देशातील सर्वोत्तम फुटबॉल रेफरी बनले आहेत. 2010 साली त्यांनी रेफरी या नात्याने आय-लीग स्पर्धेत पदार्पण केले, 2014 साली ते जागतिक फुटबॉल महासंघाचे (फिफा) मान्यताप्राप्त रेफरी बनले, तर 2016 साली त्यांना फिफा आणि आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) रेफरी मंडळात स्थान मिळाले. हा मान मिळविणारे ते सध्याचे एकमेव गोमंतकीय, तर चौथे भारतीय फुटबॉल रेफरी आहेत.

India Football: Tejas Nagvenkar
Indian Super League: फुटबॉलसाठी गोवा सुरक्षित!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com