ISL Football: विजयी प्रारंभासाठी एफसी गोवा उत्सुक

कोलकात्यात आज ईस्ट बंगालविरुद्ध लढत
FC Goa
FC Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: एफसी गोवा संघाला इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील गतमोसमात अपयश आले. त्यांची नवव्या क्रमांकावर घसरण झाली, मात्र यंदा नवे प्रशिक्षक कार्लोस पेनया यांच्या मार्गदर्शनाखाली संघ यंदाच्या मोसमात विजयी प्रारंभ करण्यास उत्सुक आहे.

(Indian Super League Football Tournament FC Goa will start strongly)

कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर बुधवारी (ता. 11) एफसी गोवासमोर ईस्ट बंगालचे आव्हान असेल. स्टीफन कॉन्स्टंटाईन यांच्या मार्गदर्शनाखाली ईस्ट बंगालला मोहिमेस अपेक्षित सुरवात करता आलेली नाही. स्पर्धेतील पहिल्याच लढतीत त्यांना केरळा ब्लास्टर्सकडून 3-1 फरकाने पराभव स्वीकारावा लागला. गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत त्यांना अकराव्या क्रमांकावर राहावे लागले होते. एफसी गोवाचा माजी खेळाडू इव्हान गोन्झालेझ यावेळेस ईस्ट बंगालचा कर्णधार आहे.

लढवय्या संघाकडून अपेक्षा

एफसी गोवा संघ बुधवारी यंदाच्या स्पर्धेतील पहिला सामना खेळेल. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत प्रशिक्षक पेनया यांनी आपला संघ लढवय्या असल्याचे सांगितले. ‘‘आमचा संघ लढाऊ बाण्याचा आहे आणि तशी छाप आम्ही पाडू. मोसमपूर्व शिबिरात प्रत्येक खेळाडूने मेहनत घेतली आहे. सातत्य कायम राखण्यासाठी आमचा प्रयत्न राहील,’’ असे पेनया म्हणाले.

‘‘ईस्ट बंगालला पहिल्या लढतीत पराभव पत्करावा लागला, तरीही घरच्या मैदानावर त्यांना कमी लेखता येणार नाही. चाहत्यांचा पाठिंबा त्यांच्यासाठी जमेची बाजू असेल. आमच्यासमोर खेळ उंचावण्याचे मोठे आव्हान असेल, तरीही विजय हे आमचे लक्ष्य राहील,’’ असा विश्वास स्पॅनिश प्रशिक्षकाने व्यक्त केला.

FC Goa
India Tour Of New Zealand: T20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर, शेड्यूल जाहीर

संघात नवे चेहरे

कार्लोस पेनया हे एफसी गोवाचे माजी खेळाडू, आता दोन वर्षांनंतर प्रशिक्षक या नात्याने त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. एफसी गोवाने पाच नवे परदेशी खेळाडू करारबद्ध केले आहेत. त्यामुळे या संघाच्या कामगिरीबाबत उत्सुकता आहे.

FC Goa
36 National Tournament: बॉक्सर पुष्पेंद्र ब्राँझपदकाचा मानकरी

आकडेवारीत...

एफसी गोवा आणि ईस्ट बंगाल यांच्यातील 5 आयएसएल लढतीत गोल 15 झालेले

सलग सामने ईस्ट बंगाल आयएसएल स्पर्धेत विजयाविना

एफसी गोवा संघात सात नवे चेहरे. पाच परदेशी, दोघे भारतीय

ईस्ट बंगालविरुद्ध एफसी गोवाचा एकमेव विजय, दोन लढतीत पराभव, दोन लढती बरोबरीत

कोविडमुळे दोन मोसम गोव्यात खेळल्यानंतर ईस्ट बंगालचा चाहत्यांसमोर पहिलाच ‘होम’ सामना

एफसी गोवाला अजूनपर्यंत कोलकात्यात आयएसएल स्पर्धेतील विजय नोंदविणे शक्य झालेले नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com