Indian Super League : ईस्ट बंगाल संघात आणखी एक गोमंतकीय

Indian Super League : बचावपटू डॅनियल गोम्सच्या करारावर शिक्कामोर्तब
Indian Super League : Daniel Gomes
Indian Super League : Daniel GomesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजीः आगामी इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेसाठी कोलकात्याच्या एससी ईस्ट बंगाल (SC East Bengal) संघाने गोमंतकीय बचावपटू डॅनियल गोम्स (Daniel Gomes) याच्या करारावर बुधवारी शिक्कामोर्तब केले. 2021-22 मोसमासाठी ईस्ट बंगालने करारबद्ध केलेला तो गोव्यातील पाचवा फुटबॉलपटू आहे. ईस्ट बंगालने यापूर्वीच रोमियो फर्नांडिस, सेरिनियो फर्नांडिस, जॉयनर लॉरेन्स व आदिल खान या गोमंतकीयांना करारबद्ध केले आहे. डॅनियल गतमोसमात गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत साळगावकर एफसी संघातर्फे खेळला होता. ‘‘आयएसएल स्पर्धेतील पदार्पणाच्या मोसमाबाबत मी आशावादी आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूंकडून शिकण्यावर भर राहील,’’ असे डॅनियल याने सांगितले. डॅनियल 24 वर्षांचा असून सेंटर-बॅक जागी खेळतो. 2015 साली वयाच्या 18व्या वर्षी तो साळगावकर एफसीच्या 19 वर्षांखालील संघात दाखल झाला, तीन वर्षांनंततर त्याला साळगावकर एफसीच्या सीनियर संघात बढती मिळाली.

Indian Super League : Daniel Gomes
Indian Super League: सेरिनियोचा एफसी गोवास ‘गुडबाय’

नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती

आगामी मोसमापूर्वी ईस्ट बंगाल संघाने ब्रिटिश प्रशिक्षक रॉबी फॉलर यांच्या करार सामंजस्याने संपुष्टात आणला आहे. त्यांच्या जागी आता स्पॅनिश मान्युएल (मानोलो) डायझ नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी ते रेयाल माद्रिद कास्तिला संघाचे प्रशिक्षक होते त्यांच्यापाशी प्रशिक्षणातील दोन दशकांचा गाढा अनुभव आहे. ते 53 वर्षांचे आहेत.

Indian Super League : Daniel Gomes
Indian Super League: एफसी गोवाकडून ईशान पंडिता मुक्त

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com