Indian Super League: सेरिनियोचा एफसी गोवास ‘गुडबाय’

Indian Super League: चार वर्षे प्रतिनिधित्व केल्यानंतर संघाला सोडचिठ्ठी
Indian Super League: Sarineo Fernandes
Indian Super League: Sarineo FernandesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजीः प्रत्यक्ष मैदानावर खेळण्याची संधी शोधणाऱ्या आणखी एका फुटबॉलपटूने एफसी गोवा (FC Goa) संघाचा कायमस्वरूपी निरोप घेतला आहे. बचावपटू सेरिनियो फर्नांडिसने (Sarineo Fernandes) चार वर्षे प्रतिनिधित्व केल्यानंतर सोमवारी संघाला सोडचिठ्ठी दिली. प्राप्त माहितीनुसार, इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल मोसमात तो कोलकात्याच्या ईस्ट बंगाल संघात दाखल होईल. संघबदल प्रक्रियेतील हस्तांतरण शुल्क जाहीर करण्यात आले नसून एफसी गोवा व सेरिनियो यांनी सांमजस्याने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले. सेरिनियो एफसी गोवा संघात 2017 साली दाखल झाला, त्यापूर्वी हा 22 वर्षीय खेळाडू धेंपो स्पोर्टस क्लब संघात होता. 2018 पासून तो एफसी गोवा डेव्हलपमेंटल संघातर्फे खेळला. या संघाच्या गोवा प्रो-लीग, जीएफए 20 वर्षांखालील तासा गोवा आणि गोवा पोलिस कप विजेत्या मोहिमेत प्रमुख खेळाडू ठरला. 2019 मधील ड्युरँड कप स्पर्धेत तो एफसी गोवाच्या डेव्हलपमेंटल संघाकडून खेळला होता. 2020-21 मोसमात तो एफसी गोवाच्या मुख्य संघात तो दाखल झाला, पण सीनियर संघातर्फे एकही सामना खेळू शकला नाही. गतमोसमात त्याने डेव्हलपमेंटल संघाचे नेतृत्वही केले. संघ सोडताना सेरिनियो याला भावी वाटचालीसाठी एफसी गोवा व्यवस्थापनाने शुभेच्छा दिल्या आहेत.

Indian Super League: Sarineo Fernandes
Indian Super League: एफसी गोवाकडून ईशान पंडिता मुक्त

अमरजितही ‘लोन’वर संघाबाहेर

आयएसएल मोसमापूर्वी एफसी गोवा संघाने आणखी एका खेळाडूस ‘लोन’वर दुसऱ्या संघात पाठविले आहे. भारताच्या 17 वर्षांखालील संघाचा माजी कर्णधार अमरजितसिंग कियाम आगामी मोसमात ईस्ट बंगालतर्फे खेळेल. भारतात 2017 साली झालेल्या 17 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत अमरजित यजमान संघाचा कर्णधार होता. सध्या 20 वर्षांचा असलेला सेंट्रल मिडफिल्डर 2021-22 मोसमात ईस्ट बंगालच्या जर्सीत दिसेल. 2017 साली त्याने इंडियन ॲरोज संघातर्फे कारकिर्दीस सुरवात केल्यानंतर त्याने आयएसएल संघातील जमशेदपूर एफसी संघाचे प्रतिनिधित्व केले. यावर्षी जानेवारीत तो मागील आयएसएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी एफसी गोवा संघात दाखल झाला होता. अमरजित जमशेदपूर एफसीतर्फे आयएसएल स्पर्धेत 15 सामने खेळला असून एफसी गोवातर्फे तो या स्पर्धेत फक्त दोनच सामने खेळू शकला. एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत त्याने एफसी गोवाचे चार सामन्यांत प्रतिनिधित्व केले.

Indian Super League: Sarineo Fernandes
Indian Super League : एफसी गोवा संघात नवा ‘विंगर’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com