Neeraj Yadav Demise: भारतानं गमावला हिरा! तीन वेळचा पॅरा आशियाई सुवर्णपदक विजेता नीरज यादवचं निधन; विष प्राशन करुन संपवलं जीवन

Neeraj Yadav Para Athlete Demise: तीन वेळचा पॅरा आशियाई सुवर्णपदक विजेता आणि प्रसिद्ध पॅरा ॲथलीट नीरज यादवने आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला.
Neeraj Yadav Para Athlete Demise
Neeraj Yadav Para Athlete DemiseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Neeraj Yadav Para Athlete Demise: क्रीडा जगतातून एक अत्यंत दुःखद आणि हादरवून टाकणारी बातमी समोर आली. तीन वेळचा पॅरा आशियाई सुवर्णपदक विजेता आणि प्रसिद्ध पॅरा ॲथलीट नीरज यादवने आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला. मंगळवारी रात्री त्याने आपल्या फ्लॅटवर विष प्राशन करुन टोकाचे पाऊल उचलले. मृत्यू समयी तो 42 वर्षांचा होता आणि ॲथलेटिक्समधील एफ-55 (F55) श्रेणीत भारताचे प्रतिनिधित्व करत होता. सध्या दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम सुरु असून त्याने हे धक्कादायक पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

दरम्यान, 42 वर्षीय पॅरा ॲथलीट आणि जाव्हलीन थ्रोअर नीरजने विष प्राशन केल्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. त्याचे सहकारी पॅरालिम्पिक चॅम्पियन सुमित अंतिल आणि विपिन कसाना रुग्णालयात उपस्थित होते. भारताचे (India) मुख्य पॅरा ॲथलेटिक्स प्रशिक्षक एस. सत्यनारायण यांनी या दुर्देवी वृत्ताला दुजोरा दिला. सत्यनारायण यांनी सांगितले की, नीरजने मंगळवारी रात्री राहत्या घरी विष प्राशन केले.

Neeraj Yadav Para Athlete Demise
Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताचा डंका! संदीप, हॅनीच्या विश्वविक्रमी कामगिरीमुळे पदकांचं शतक; 'गोल्ड'ची संख्या 26 वर

प्रशिक्षकांच्या मते, नुकत्याच पार पडलेल्या पॅरा गेम्समध्ये सहभाग न घेता आल्यामुळे नीरज नैराश्यात असावा आणि कदाचित याच कारणामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे. डोपिंग निलंबनामुळे तो या स्पर्धेत खेळू शकला नव्हता.

Neeraj Yadav Para Athlete Demise
Asian Para Games 2026: भारताच्या गोल्डन गर्लची कमाल! शीतल देवीने अवघ्या काही तासांत जिंकली दोन सुवर्णपदके; एशियन पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

प्रशिक्षकांनी पुढे सांगितले की, नीरज आगामी आशियाई पॅरा गेम्समध्ये खेळण्यासाठी खूप उत्सुक होता. या स्पर्धांमध्ये पदक मिळवल्यास सरकारकडून मोठा इनाम आणि नोकरीची संधी मिळते; मात्र निलंबन न संपल्यामुळे त्याला स्पर्धेला मुकावे लागले, ज्याचा त्याच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम झाला असावा. उत्तर प्रदेशचा राहणारा नीरज हा भारताच्या सर्वात यशस्वी पॅरा ॲथलीट्सपैकी एक होता.

Neeraj Yadav Para Athlete Demise
Asian Games Final IND vs PAK: सुवर्णपदकाच्या सामन्यात टीम इंडियाचा दबदबा! पाकिस्तानच्या खेळाडूंनी टाकल्या नांग्या, मिळवला दिमाखदार विजय

वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्याला पोलिओ झाला, परंतु हार न मानता त्याने क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. 2005 ते 2012 पर्यंत त्याने व्हीलचेअर टेनिसमध्ये हात आजमावला आणि त्यानंतर तो पॅरा ॲथलेटिक्सकडे वळला. 2015 मधील राज्यस्तरीय स्पर्धा असोत किंवा 2018 आणि 2023च्या आशियाई पॅरा गेम्सच्या जाव्हलीन थ्रो आणि डिस्कस थ्रोमध्ये सुवर्णपदके जिंकून भारताचा मान उंचावला. त्याच्या या अकाली जाण्याने संपूर्ण क्रीडा विश्वात शोककळा पसरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com